IND vs AUS, India Playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर मालिकेला उद्यापासून (9 फेब्रुवारी 2023) सुरुवात होत आहे. नागपूरच्या पाटा खेळपट्टीवर दोन्ही संघ उतरणार आहेत. जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत यांच्या अनुपस्थितीत कुणाला संधी मिळणार? रविंद्र जाडेजा पुनरागमन करणार का? सलामीला कोण खेळणार? वेगवान गोलंदाजीची धुरा कोण सांभाळणार? यासारख्ये प्रश्न क्रीडा चाहत्यांच्या मनात घोंगावत आहेत. चाहत्यांच्या याच प्रश्नाची उत्तरे बीसीसीआयच्या ट्वीटमध्ये दडली आहेत. बीसीसीआयनं ट्वीट करत पहिल्या कसोटीत कोणती प्लेईंग 11 असेल त्याची हिंट दिली आहे.
तुम्ही तयार आहात का? असं ट्वीट करत बीसीसीआयने 12 फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तीन फिरकी गोलंदाज, तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. त्याशिवाय एका फोटोमध्ये कोच राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव आहेत. त्यामुळे सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळणार का? याची चर्चा सुरु झाली आहेत.
बीसीसीआयनं पोस्ट केलेल्या फोटोत कोण कोण खेळाडू ?
नागपूरच्या मैदानावर सराव करतानाचे काही फोटो बीसीसीआयने पोस्ट केले आहेत. पण या फोटोत निवडक 12 खेळाडू आणि कोच यांचा समावेश आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या कसोटी सामन्यात हेच खेळाडू असू शकतात, असा अंदाज वर्तवला जातोय. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, उप कर्णधार केएल. राहुल यांचाही समावेश आहे. त्याशिवाय, मधल्या फळीतील चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. त्यानंतर युवा शुभमन गिल याचा फोटो बीसीसीआयने पोस्ट केला आहे. आर. अश्विन, रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल या तीन अष्टपैलू फिरकीपटूंचे फोटोही बीसीसीआयने पोस्ट केले आहेत. त्यानंतर सूर्यकुमार यादव याचा फोटो राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याबरोबर फोटो पोस्ट करण्यात आलाय. तर वेगवान गोलंदाजात विदर्भ एक्स्प्रेस उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट या ती वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.
किती गोलंदाजांसह भारत उतरणार ?
पहिल्या कसोटी सामन्यात भारत पाच की सहा गोलंदाजासह उतरणार याबाबतचा प्रश्न क्रीडा चाहत्यांना पडला आहे. त्याशिवाय विकेकटिपर म्हणून केएल राहुल धुरा सांभाळणार का? यासारखे प्रश्न पडले आहेत. तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजासह उतरणार की, तीन फिरकीपटू आणि तीन वेगवान अशा सहा गोलंदाजासह उतरणार... याची चर्चा सुरु आहे. अश्विन, जाडेजा आणि अक्षर पटेल फलंदाजीतही योगदान देऊ शकतात, त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये कोण कोण असणार? याची चर्चा सुरु आहे.