MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं (MS Dhoni) 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आजही त्याच्या चाहत्यांमध्ये कोणतीही कमतरता जाणवली नाही. महेंद्रसिंह धोनच्या प्रत्येक हालचालींवर त्याच्या चाहत्यांची नजर असते. नुकताच धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओ धोनी नव्या आणि हटके लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे. 


स्टार स्पोर्ट्सनं नुकताच धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत कॅप्टन कूलच्या नावानं ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी हटके लूकमध्ये दिसत आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणात दक्षिणचा सुपरस्टार रजनीकांत यांची झलक पाहायला मिळत आहे. हा आयपीएलचा प्रोमो व्हिडिओ असल्याचं म्हटलं जातंय. या व्हिडिओत महेंद्रसिंह धोनीनं बस वाहकासारखं कपडे परिधान केले आहेत. तसेच आपल्या गळ्या मोठा रुमाल टाकल्याचं दिसत आहे. या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. 



महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2019 मध्ये आंतराष्ट्रीत क्रिकेटमधून निवृती घेतलीय. मात्र, तो आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं आयपीएलचे चार खिताब जिंकले आहेत. आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नईच्या संघानं दिल्लीचा पराभव करून चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha