IND vs AUS, Test  : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिकेतील (BGT 2023) चौथा कसोटी सामना सुरू आहे. अहमदाबाद येथे सुरू असलेल्या या कसोटी सामन्यात (IND vs AUS 4th Test)ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवात चांगली केली. दरम्यान या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं आहे. या विकेटसह रवींद्र जाडेजाने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. जाडेजाने आता स्टीव्ह स्मिथला कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा त्रिफळाचीत अर्थात बोल्ड केलं असून आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये रवींद्र जाडेजाने स्टीव्ह स्मिथला 4 वेळा बोल्ड केलं आहे, जे सर्वाधिक आहे.


स्टीव्ह स्मिथला सर्वाधिक वेळा बोल्ड करणारा गोलंदाज



  • रवींद्र जाडेजानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथला दोनदा बोल्ड केलं आहे.ट

  • इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडही तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने स्टीव्ह स्मिथला कसोटी फॉरमॅटमध्ये दोनदा बोल्ड केलं आहे.

  • भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचं नाव चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथला दोनदा बोल्ड केलं आहे.

  • या यादीत श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज रंगना हेराथचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत कसोटी सामन्यांमध्ये स्टीव्ह स्मिथला दोनदा बोल्ड केलं आहे.


ऑस्ट्रेलियाच्या नावावर पहिला दिवस


आज सर्वात आधी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियानं निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी या निर्णायप्रमाणे दमदार फलंदाजी देखील केली त्यामुळे पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची स्थिती 255 धावांवर चार गडी बाद अशी आहे. सर्वात आधी ट्रेव्हीस हेड आणि उस्मान ख्वाजाने चांगली सुरुवात संघाला करुन दिली. 32 धावा करुन हेड बाद झाला. मग लाबुशेनही 3 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार स्मिथनं ख्वाजासोबत चांगली भागिदारी केली पण 38 धावा करुन स्मिथही बाद झाला त्यानंतर हँड्सकॉम्बही 17 धावांवर तंबूत परतल्यावर कॅमरुन ग्रीननं दिवसअखेर फटकेबाजी करत 64 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या आहेत. तर ख्वाजा 251 चेंडूत नाबाद 104 धावांवर खेळत आहे. 


हे देखील वाचा-