IND vs AUS 4th Test, Day 1 : भारत (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Team Australia) यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील (IND vs AUS 4th Test) शेवटचा आणि निर्णायक सामना आजपासून (9 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad Narendra Modi Stadium) सुरु झाला आहे. सामन्यात पहिल्या दिवशीचा खेळ आटोपला असून ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत दिसून येत आहे. 255 धावा कागांरुंनी करत केवळ 4 विकेट्सच गमावले आहेत. उस्मान ख्वाजा शतक ठोकून फलंदाजी करत असून कॅमरुन ग्रीनही चांगल्या लयीत आहे. तर भारताकडून जाडेजा आणि अश्विन प्रत्येकी 1 तर शमीने दोन विकेट्स घेतल्या आहेत.
सामन्याचा विचार केला तर सर्वात आधी टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियानं निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी या निर्णायप्रमाणे दमदार फलंदाजी देखील केली त्यामुळे पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची स्थिती 255 धावांवर चार गडी बाद अशी आहे. सर्वात आधी ट्रेव्हीस हेड आणि उस्मान ख्वाजाने चांगली सुरुवात संघाला करुन दिली. 32 धावा करुन हेड बाद झाला. मग लाबुशेनही 3 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार स्मिथनं ख्वाजासोबत चांगली भागिदारी केली पण 38 धावा करुन स्मिथही बाद झाला त्यानंतर हँड्सकॉम्बही 17 धावांवर तंबूत परतल्यावर कॅमरुन ग्रीननं दिवसअखेर फटकेबाजी करत 64 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या आहेत. तर ख्वाजा 251 चेंडूत नाबाद 104 धावांवर खेळत आहे.
WTC फायनल एन्ट्रीसाठी विजय महत्त्वाचा
आजवरच्या इतिहासाचा विचार केल्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 105 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 44 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. दरम्यान आजची कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. सध्या, टीम इंडिया 60.29 च्या विजयाच्या टक्केवारीसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया 68.52 विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) पोहोचली आहे.
इतर बातम्या :