Shubman And Rashmika news : भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल (Shubhman Gill) केवळ क्रिकेटच्या मैदानावरील त्याच्या खेळासाठीच नाही तर त्याच्या काही वैयक्तिक आयुष्यातील अफेयर्सच्या चर्चांसाठीही चर्चेत असतो. दरम्यान, याआधी शुभमन गिल अभिनेत्री सारा अली खानला डेट करत असल्याच्या बातम्या येत असतानाच आता त्याचं नाव साउथ फिल्म स्टार अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत (Rashmika Mandana) जोडलं जात आहे.


एका इन्स्टाग्रामवरील एन्टरटेनमेंट पेजने शुभमन गिल आणि रश्मिका मंदान्ना (Shubhman and Rashmika) यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी दावा केला आहे की गिलने एका मुलाखतीदरम्यान कबूल केले की त्याचा पहिला क्रश रश्मिका मंदान्ना होता. त्याचवेळी गिलने दिलेलं उत्तरही सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. शुभमन गिलने या पोस्टला रिप्लाय देताना लिहिलं की, मी कोणत्या मीडियासोबत मुलाखतीत हे बोललो, ज्याबद्दल मला स्वतःलाच माहिती नाही. मात्र, या पोस्टवर अभिनेत्री रश्मिका मंदान्नाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.


शुभमन गिल अहमदाबाद कसोटी सामन्यात अंतिम 11 मध्ये


भारतीय संघ सध्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळत आहे, शुभमन गिल देखील या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनचा एक भाग आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये गिलला खेळण्याची संधी मिळाली नाही. लोकेश राहुलचा सतत खराब फॉर्म पाहता इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने शुभमन गिलला खेळवण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात गिलच्या बॅटने दोन्ही डावात केवळ 21 आणि 5 धावा केल्या होत्या. संघाने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास व्यक्त केला असून त्याला अहमदाबाद कसोटीत संधी दिली आहे. दुसरीकडे शुभमन गिलनं आतापर्यंत कसोटीत 4 आणि एकदिवसीय सामन्यात 4 शतकं झळकावली आहेत. आता त्यानं काही दिवसांपूर्वी टी-20 मध्येही शतक झळकावलं. मागील महिन्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत द्विशतक आणि एक शतक त्यानं झळकावलं होतं आणि अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टी-20 सामन्यात टी-20 मधील पहिलं शतक झळकावलं. शुभमन गिल टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 126 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्यानं विराट कोहली आणि रोहित शर्मासह सर्व दिग्गज भारतीयांना मागे टाकलंय. पण कसोटीत सध्या तो फॉर्माकत नसून आता तरी त्याचा फॉर्म परतेल अशी आशा फॅन्सना आहे.


हे देखील वाचा-