IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 25 जानेवारी रोजी पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.  मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.  घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या मोहम्मद शामीला कसोटी मालिकेतील (Test match) पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्या दुखापतीमध्ये अद्याप हवी तशी सुधारणा नाही, त्यामुळे उर्वरित तीन सामन्यातही त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद शामीला उपचारासाठी लंडनला पाठवण्यात येणार आहे.


इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यात मोहम्मद शामीला दुखापतीमुळे संघात स्थान मिळाले नव्हते. अखेरच्या तीन सामन्यासाठी त्याला संधी मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण त्याची दुखापत गंभीर असल्याचं समजतेय. त्याला उपचारासाठी इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे.  त्यामुळे मोहम्मद शामी टीम इंडियात लवकर कमबॅक करण्याची शक्यता कमीच आहे. 
  
विश्वचषकात मोहम्मद शामी याने भेदक मारा केला होता. शामीने विश्वचषकातील सात सामन्यात 24 विकेट घेतल्या होत्या. विश्वचषक स्पर्धेनंतर मोहम्मद शामी याच्या घोट्याला दुखापत झाली. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार मोहम्मद शामीला उपचारासाठी लंडनला पाठवण्याची बीसीसीआयकडून तयारी सुरू आहे.  शामी नॅशनल क्रिकेट अकादमीचे स्पोर्ट्स सायन्स हेड नितीन पटेल यांच्यासोबत लंडनला रवाना होणार आहे, असा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. 


इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया  -


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान. 


पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ - 


बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड. 


भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -  


पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)