India Vs Australia Semi-final ICC Champions Trophy 2025 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना दुबईमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान, भारतीय संघासोबत सलग 13 वेळा घडत असलेला तोच प्रकार घडला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टॉस गमावला. भारताने सलग 14 व्यांदा नाणेफेक गमावली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू झाला आहे.  कांगारू संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी ट्रॅव्हिस हेड आणि कूपर कॉनोली मैदानावर आले आहेत. तर भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आला आहे.


पहिल्याच चेंडूवर शमीने सोडला ट्रॅव्हिस हेडचा कॅच


चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिला सेमीफायनलमध्ये पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने ट्रॅव्हिस हेडचा झेल सोडला. मोहम्मद शमीच्या चेंडूने ट्रॅव्हिस हेडला फसवले होते. चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागला आणि शमीकडे गेला, त्याला चेंडू पकडण्याची संधी होती, पण चेंडू त्याच्या हाताला लागला. आणि कॅच सुटला त्यामुळे ट्रॅव्हिस हेडला जीवनदान मिळाले. पहिल्या षटकात फक्त दोन धावा झाल्या. प्रमुखाने खाते उघडले आहे.






ट्रॅव्हिस हेड पुन्हा नडणार?


या सामन्यात भारतासमोर सर्वात मोठे आव्हान असेल ते ट्रॅव्हिस हेडला रोखण्याचे असणार आहे. हेडची बॅट भारताविरुद्ध नेहमी चांगली कामगिरी करते. विशेषतः आयसीसी स्पर्धांमध्ये, तो भारतीय गोलंदाजांना खूप त्रास देतो. हा तोच हेड आहे ज्याने 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आणि 2023 च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपल्या शानदार फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. हेडने अफगाणिस्तानविरुद्ध 40 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या, ज्यावरून तो फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येते.  


आयसीसी स्पर्धांमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचे वर्चस्व 


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या काही वर्षांत आयसीसी स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजवले आहे. भारतीय संघ 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, जिथे त्यांना त्याच ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर, रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि दक्षिण आफ्रिकेला हरवून विजेतेपद जिंकले. आता संघाला मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्वरूपात सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी असेल.


हे ही वाचा -


IND vs AUS Toss Update : सलग 14 व्यांदा रोहित शर्मा हरला टॉस! 'या' 11 खेळाडूंसह टीम इंडिया जिंकणार सेमीफायनल? ऑस्ट्रेलियन संघात 2 बदल