Mohammed Shami Ind vs Eng T20 Match : भारतीय क्रिकेट चाहते जवळपास एका वर्षापेक्षा जास्त काळ एका खेळाडूची आतुरतेने वाट पाहत होते. हा दुसरा कोणी नसून मोहम्मद शमी आहे, जो नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापासून टीम इंडियातून बाहेर होता. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि मग तो बराच काळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये म्हणजेच एनसीएमध्ये राहिला. या काळात या स्टार गोलंदाजाचे टीम इंडियामध्ये पुनरागमन अनेक वेळा असे वाटत होते. परंतु अखेर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला. आता 14 महिन्यांनंतर शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवण्यास सज्ज आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची टी-20 मालिका 22 जानेवारीपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे सुरू होणार आहे, ज्यामध्ये शमी देखील खेळताना दिसेल. या मालिकेसाठी भारतीय संघ कोलकाता येथे पोहोचला आहे आणि त्यांनी सराव देखील सुरू केला आहे. 19 जानेवारी रोजी शमी टीम इंडियासोबत कोलकात्याच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदान ईडन गार्डन्सवर पोहोचला. यावेळी सर्वांच्या नजरा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर होत्या.


बीसीसीआयने शमीच्या टीम इंडियामध्ये सामील होण्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, शमी युवा अष्टपैलू नितीश रेड्डीसोबत मैदानावर जाण्यासाठी बसमध्ये जातो आणि नंतर मैदानात प्रवेश करताना दिसत आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल शमीला पाहून मिठी मारत आहे आणि खूप आनंदी दिसत आहेत. भारतीय चाहते या व्हिडिओवर खूप लाईक करत आहेत.






दुखापतीमुळे 14 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियामध्ये परतलेल्या शमीने एका तासापेक्षा जास्त वेळ पूर्ण लयीत गोलंदाजी केली. डाव्या गुडघ्याला पट्टी बांधलेली असताना, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांच्या देखरेखीखाली शमीने सुरुवातीला शॉर्ट रन-अपसह हळू गोलंदाजी केली आणि नंतर पूर्ण रन-अपसह त्याचा वेग वाढवला. सुमारे एक तास गोलंदाजी केल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षणाच्या सरावातही भाग घेतला.


इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जूरेल, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्थी, वॉशिंग्टन सुंदर.


हे ही वाचा -


Neeraj Chopra Marriage : ना गाजा वाजा... ना बँड बाजा... गुपचूप लग्न करणाऱ्या गोल्डन बॉय नीरज चोप्राची प्रॉपर्टी किती? आकडा ऐकून फिरतील डोळे