Mumbai Cricket Association To Introduce Graduation Programme For Cricketers : भारतातील क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर तो एक धर्म आहे. काही मुले वयाच्या 10 वर्षापूर्वीच व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात करतात. पण शाळेच्या अभ्यासक्रमात कधी  क्रिकेट हा विषय नव्हता, पण आता क्रिकेटचा अभ्यास करून पदवीधर होता येणार आहे... होय खरं आहे. त्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी मोठे पाऊल उचलले आहे. खरंतर, मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) सहकार्याने असा पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) कार्यकारिणीच्या बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) लवकरच मुंबई विद्यापीठाच्या सहाय्याने पदवीधर अभ्यासक्रम सुरू करणार आहे. "क्रिकेट हा व्यावसायिक खेळ झाला आहे. त्यासाठी अनेक क्षेत्रांतून मदत मिळत असते. खेळपट्टी तयार करणे, व्हिडीओ विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, पंच यांसारख्या विविध बाबींमध्ये प्राविण्य मिळवता येणार आहे. येत्या जून-जुलै अकेडेमीकमध्ये हा प्रोग्रॅम रन केला जाईल. यासाठी दहा हजार मुलांचा रजिस्ट्रेशन असणार आहे. जे एमर्जिंग प्लेअर्स आहेत त्यांच्यासाठी हे बॅकिंग प्लॅन असणार आहे," असे मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षचे अजिंक्य नाईक त्यांनी सांगितले.


युवा खेळाडूंसाठी इंग्लंडचा दौरा!


मुंबईतील अनेक क्लब आपल्या खेळाडूंसाठी इंग्लंडचा दौरा आयोजित करतात. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईतील युवा खेळाडूंसाठी इंग्लंडचा दौरा आयोजित करण्यात येणार आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी बैठकीत या निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.


क्रिकेटचा उदय कधी झाला?


1300 च्या आसपास युरोपमध्ये क्रिकेटचा उदय झाला असे म्हटले जाते पण याला पुरावा नसल्याने तसे म्हणता येणार नाही. क्रिकेटबद्दल 16व्या शतकातील, इंग्लंडमधील ट्युडर काळापर्यंतचे पुरावे मिळतात. त्यामुळे बहुतांश लोक तेव्हा हा खेळ प्रचलित झाला असे मानतात. क्रिकेट हा मुळात लहान मुलांचा खेळ आहे असे पूर्वी मानले जात असे.


हे ही वाचा -


Team India Playing-11 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचे 11 शिलेदार कोण? समोर आली सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन; माजी कोचच्या रोहित सेनेत कोणाचा समावेश?


Rachin Ravindra Injury Update : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी किवी संघात खळबळ! तिरंगा मालिकेतील फायनलमधून रचिन रवींद्र बाहेर; काही दिवसापूर्वी फुटले होते डोके