Mahela Jayawardene On Ravindra Jadeja: ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2022) बीसीसीआयनं (BCCI) 15 सदस्यीय खेळाडूंची निवड केलीय. या स्पर्धेत रोहित शर्माकडं (Rohit Sharma) भारतीय संघाची धुरा संभाळणार आहे. तर, केएल राहुल (KL Rahul) उपकर्णधारपदाची जबाबदारी संभाळणार आहे. परंतु, भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) दुखापतीमुळं टी-20 विश्वचषकाला मुकाव लागलंय. रवींद्र जाडेजा हा भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्यानं भारताच्या अनेक विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याचं टी-20 विश्वचषकाच्या संघातून बाहेर पडणं भारतासाठी मोठा धक्का आहे, असं मत श्रीलंकेचा माजी कर्णधार महिला जयवर्धनेनं (Mahela Jayawardene) व्यक्त केलंय. 


रविंद्र जाडेजा तुफान फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजीसह फलंदाजीत तो चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध सामन्यात रविंद्र जाडेजानं 35 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. ज्यामुळं भारताला पाकिस्तानला धुळ चारण्यास यश आलं होतं. मात्र, त्यानंतर हाँगकाँगविरुद्ध सामन्यात त्याला दुखापत झाली होती. 


रवींद्र जाडेजाबाबत जयवर्धने काय म्हणाला?
द आयसीसी रिव्ह्यूमध्ये महिला जयवर्धने म्हणाला की, "भारतासमोर हे एक मोठं आव्हान असेल. भारताच्या फलंदाजीच्या क्रमवारीत जाडेजा पाचव्या क्रमांकावर फिट होता. तसेच तो चांगल्या फॉर्मध्येही दिसत होता. तर, हार्दिक पांड्या सहा क्रमांकासाठी योग्य होता. हे दोन्ही खेळाडू भारतासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात, जी संघासाठी उपयुक्त ठरेल. रवींद्र जाडेजाचं संघात नसणं, भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे". 


टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संघ- 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.


मुंबई इंडियन्सच्या संघानं महिला जयवर्धनेवर मोठी जबाबदारी
मुंबई इंडियन्सच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक महिला जयवर्धनेनं मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिलाय. मुंबई इंडियन्सच्या संघानं त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवल्यानं महिला जयवर्धनेनं हा निर्णय घेतलाय. महिला जयवर्धनेंची हेड ऑफ परफॉरमन्स पदी नियुक्ती करण्यात आलीय. यापुढं जयवर्धनें मुंबई फ्रँचायझीच्या 3 संघांच्या प्रदर्शनाला सुधारण्याचे काम पाहतील.


हे देखील वाचा-