Manish Pandey and Ashrita Shetty Divorce Rumours : एकीकडे टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या थांबलेल्या नाहीत. चहल आणि धनश्री वर्मा लवकरच घटस्फोट घेऊ शकतात असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाचा आणखी एका खेळाडू घटस्फोट घेणार असल्याची बातमी येत आहे. चहलनंतर आता टीम इंडियाचा फलंदाज मनीष पांडेच्या घटस्फोटाबाबत अटकळ सुरू झाली आहे.


कर्नाटककडून खेळणाऱ्या मनीषचे लग्न अभिनेत्री आश्रिता शेट्टीशी 2 डिसेंबर 2019 मध्ये झाले. या लग्नाची खूप चर्चा झाली होती. कारण त्यावेळी मनीष कर्नाटक संघाचा कर्णधार होता आणि त्याने संघाला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नेले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम सामना जिंकला. ट्रॉफी उचलल्यानंतर मनीषने दुसऱ्या दिवशी लग्न केले. म्हणजेच, अवघ्या 24 तासांत मनीषने आपल्या संघाला चॅम्पियन बनवले आणि लग्नही केले.




मनीष आणि आश्रिता यांनी एकमेकांना केले अनफॉलो 


खरंतर, गेल्या वर्षी जूनपासून आश्रिताने इन्स्टाग्रामवर तिचा पती मनीष पांडेसोबत एकपण फोटो पोस्ट केला नाही. आणि दुसरीकडे मनीष पांडेच्या सोशल अकाउंटवरून पण कोणती पोस्ट नाही. लग्नानंतर दोघेही अनेकदा एकत्र दिसले, पण गेल्या काही काळापासून दोघेही एकत्र दिसले नाहीत. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. यावरून असे दिसून येते की दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे.




पती-पत्नीने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो करणे घटस्फोटाशी काहीही संबंध नाही, परंतु जेव्हा हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक घटस्फोट घेणार होते. त्याआधी दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. याच कारणास्तव, मनीष आणि आश्रिता घटस्फोट घेणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


आयपीएलमध्ये ठोकले शतक    


2009 मध्ये मनीष पांडेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना आयपीएलमध्ये शतक झळकावले. आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूने केलेले हे पहिले शतक होते. आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर, मनीषने टीम इंडियासाठी पदार्पण केले.


हे ही वाचा -


Ravindra Jadeja : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी रवींद्र जडेजा क्रिकेटला करणार अलविदा? इंस्टाग्राम स्टोरीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ