Laver Cup 2022 Live : टेनिस जगतातील सुपरस्टार रॉजर फेडररने (Roger Federer) काही दिवसांपूर्वीच म्हणजे 15 सप्टेंबर रोजी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. रॉजर फेडररच्या या घोषणेनंतर बरेच टेनिस चाहते उदास झाले. पण आता फेडरर चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रॉजर फेडरर पुन्हा कोर्टवर उतरणार असून तो लेव्हर कपमध्ये (Laver Cup 2022) खेळताना दिसणार आहे. रॉजर फेडररसह राफेल नदालसारखे बरेच मोठे टेनिस स्टार या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. ज्यामुळे टेनिसप्रेमी लेव्हर कपची आतुरतेने वाट पाहत आहेत.


युरोप संघात असणार रॉजर


लेव्हर कपमध्ये रॉजर फेडरर युरोप संघाचा भाग आहे. युरोप संघात रॉजर फेडररशिवाय राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरेसारखे दिग्गज आहेत. टीम युरोपचा कर्णधार ब्योर्न बोर्गला त्याच्या संघासाठी हा लेव्हर कप जिंकवून देऊन रॉजर फेडररला एक संस्मरणीय निरोप द्यायचा असणार हे नक्की. संबधित स्पर्धा 23 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना 25 सप्टेंबरला होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामने संध्याकाळी 5 वाजल्यापासून खेळवले जातील. भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. त्याच वेळी, भारतीय टेनिसप्रेमी सोनी लाईव्ह अॅपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.  


कसे आहेच लेव्हर कपसाठी संघ?


टीम युरोप


रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच, अँडी मरे, स्टेफानोस सित्सिपास, कॅस्पर रुड


टीम वर्ल्ड


फेलिक्स ऑगर-अलियासिम, फ्रान्सिस टियाफो, डिएगो श्वार्ट्जमन, अॅलेक्स डी मिनोर, टेलर फ्रिट्ज, जॅक सॉक


फेडररची कारकिर्द


रॉजर फेडरर यानं 15 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावरुन निवृत्तीची घोषणा केली होती. तो लेव्हर कप 2022 नंतर टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे. फेडरर हा इतका महान खेळाडू आहे की तो जवळपास 310 आठवडे एटीपीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर होता. तो 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरूष टेनिसपटू ठरला होता. फेडररने आपल्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीत सहा ऑस्ट्रेलियन ओपन (2004, 2006, 2007, 2010, 2017, 2018), एक फ्रेंच ओपन टायटल (2009), आठ विम्बल्डन (2003, 2004, 2005, 2006, 2007, 2009, 2012, 2017) तर पाच युएस ओपन (2004, 2005, 2006, 2007, 2008) ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. त्याने 2018 ला आपले शेवटचे ग्रँडस्लॅम (ऑस्ट्रेलियन ओपन) जिंकले होते. 


हे देखील वाचा-