IND vs BAN, 2nd Test: भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सध्या ढाका येथे सुरु दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने अंतिम 11 मध्ये एक मोठा बदल केला आहे. संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवच्या (Kuledeep Yadav) जागी जयदेव उनाडकटला (Jaydve Unadkat) स्थान दिलं आहे. टीम इंडियाच्या या निर्णयावर चाहते प्रचंड संतापले आहेत. कारण पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला होता. त्याने एकूण 8 विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत त्याला प्लेईंग-11 मधून वगळणं भारतीय चाहत्यांना पसंत आलेलं नाही.


कुलदीप यादवने याआधी अनेक वेळा भारतीय संघासाठी कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तरी तो सतत संघात आत आणि बाहेर होताना दिसतो. त्यामुळे एक दमदार गोलंदाज असूनही टीम इंडिया नियमितपणे प्लेईंग-11 मध्ये त्याचा समावेश का करत नाही, असा संतप्त सवाल चाहते विचारत आहेत. मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर विकेटही फिरकीपटूसाठी अनुकूल आहे. अशा परिस्थितीत स्पिनरऐवजी अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णयामुळे चाहते नाराज झाले असून सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत.


























 


दुसऱ्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया


केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज


हे देखील वाचा-