IND vs BAN Toss Update : भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना ढाका येथील शेर ए बांग्ला स्टेडियमवर खेळवला जात आहे. नुकतीच नाणेफेक (India vs Bangladesh Toss Update) पार पडली आहे. भारताने नाणेफेक गमावली असून बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. कसोटी सामना असल्याने सुरुवातीलाच दमदार फलंदाजी करुन एक मोठी धावसंख्या उभारण्याचा बांगलादेशचा डाव आहे.
पहिल्या कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी घेत सुरुवातीपासून सामन्यात वर्चस्व ठेवलं होतं. आज बांगलादेशनंही हाच विचार करुन प्रथम गोलंदाजी घेतली आहे. त्यात सामना होणाऱ्या ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी मदत देणारी आहे. त्यामुळे भारताचे फिरकीपटू कमाल करणार का हे पाहावे लागेल.तसंच याठिकाणी फलंदाजानाही मदत मिळू शकते त्यामुळे एक मोठी धावसंख्या भारत उभारेल अशी आशा आहे. पण आऊटफिल्ड स्लो असल्याने शॉट्स खेळताना फलंदाजांना मेहनत घ्यावी लागणार आहे.
कसा आहे भारतीय संघ?
भारतीय संघाचा (Team India) विचार करता संघात एक बदल करण्यात आला आहे. बऱ्याच काळ प्रतिक्षेत असणाऱ्या जयदेव उनाडकट याने अखेर संघात पुनरागमन केलं असून त्याचा अंतिम 11 मध्ये समावेश झाला आहे. कुलदीप यादवला विश्रांती देत जयदेवला संधी दिली गेली आहे. नेमके दोन्ही संघ कसे आहेत पाहूया...
असे आहेत दोन्ही संघ?
भारत: केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज
बांगलादेश: नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन (विकेटकिपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, तस्किन अहमद
हे देखील वाचा-