WTC Points table : कसोटी क्रिकेटचा विश्वचषक म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या (World Test Championship) फायनलसाठीचा एक संघ आपल्या समोर आला आहे. वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारे संघ ही फायनल खेळत असून ऑस्ट्रेलियाने आपली जागा पक्की केली आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात चुरस आहे. ऑस्ट्रेलिया 68.52 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर भारतीय संघ सध्या 60.29 गुणांची टक्केवारी घेऊन दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामना तगड्या फरकाने जिंकल्यामुळे भारतही मजबूत स्थितीत असला तरी अद्याप भारताने WTC फायनलमध्ये एन्ट्री मिळवलेली नाही. अखेरचा सामना भारताने जिंकल्यास भारत सहज एन्ट्री मिळवेल. पण तसं न झाल्यास श्रीलंका जो तिसऱ्या स्थानावर आहे, त्यांचा न्यूझीलंडकडून पराभव झाल्यास भारताची WTC फायनलमधील एन्ट्री सोपी होईल. दरम्यान आज भारत आणि ऑस्ट्रेलियन संघ यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यावर नेमकी गुणतालिका कशी आहे. ते पाहूया...

आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022-23 गुणतालिका:
 
संघ विजय पराभव अनिर्णीत एकूण गुण विजयी टक्केवारी
1. ऑस्ट्रेलिया 11 3 4 148 68.52
2. भारत 10 5 2 123 60.29
3.श्रीलंका 5 4 1 64 53.33
4. दक्षिण आफ्रीका 7 6 1 88 52.38
5. इंग्लंड 10 8 4 124 46.97
6. वेस्ट इंडीज 4 5 2 54 40.91
7. पाकिस्तान 4 6 4 64 38.10
8. न्यूझीलंड 2 6 3 36 27.27
9. बांगलादेश 1 1 10 16 11.11

सामन्याचा लेखा-जोखा

इंदूर येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताच्या पराभवाचं मोठं कारण खराब फलंदाजी हे होतं. त्यात नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी निवडण्याचा निर्णयही भारताचा चूकला. कारण पिच स्पीन फ्रेडंली असताना प्रथम फलंदाजी घेऊन भारताचा डाव स्वस्तात आटोपला. पहिल्या दिवशी भारतीय संघाला अवघ्या 109 धावांत कांगारुंनी सर्वबाद केलं. ज्यानंतर पहिल्या दिवशी एकूण 4 आणि दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर उर्वरीत 6 विकेट्स घेत भारताने 197 धावांत ऑस्ट्रेलियाला रोखलं. ज्यानंतर 88 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेला भारत दुसऱ्या डावातही 163 धावाच करु शकला. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान इतकी धावसंख्या केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारत सर्वबाद झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला ज्यानंतर तिसऱ्या दिवशी 76 धावांची गरज कांगारुंना विजयासाठी होती. तिसऱ्या दिवशी पहिल्या षटका एक विकेट गमावल्यावर मात्र ऑस्ट्रेलियाच्या लाबुशेन आणि हेड यांनी स्फोटक फलंदाजी करत सहज विजय संघाला मिळवून दिला.

हे देखील वाचा-