MI-W vs UPW-W, Match Highlights : महिला प्रीमियर लीग (WPL) एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा 72 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अशाप्रकारे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने अंतिम फेरी गाठली आहे. मुंबई इंडियन्ससमोर अंतिम सामन्यात यूपी वॉरियर्सचा संघ असणार आहे. 26 मार्च रोजी उभय संघांमधील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान थोडक्यात फायनलमध्ये पोहोचण्याची यूपीची संधी हुकली तर नेमकी काय कारणं याला कारणीभूत ठरली जाणून घेऊ...
यूपी वॉरियर्सच्या खेळाडूंचे खराब क्षेत्ररक्षण
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सच्या खेळाडूंनी चांगले क्षेत्ररक्षण केले नाही. एलिसा हिलीच्या संघाने अनेक मिसफिल्ड केले. त्याचवेळी यूपी वॉरियर्सच्या खेळाडूने नीट सिव्हर ब्रंटचा सोपा झेल सोडला. ज्या वेळी नीट सीवर ब्रंटचा झेल सुटला, त्यावेळी ती अवघ्या 7 धावांवर खेळत होती, त्यानंतर तिने आपल्या डावाने सामना बदलला. नीट सीवर ब्रंटने 38 चेंडूत 72 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले.
यूपीची खराब डेथ बॉलिंग
डेथ ओव्हर्समध्ये यूपी वॉरियर्सच्या संघाने निराशाजनक गोलंदाजी केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने शेवटच्या 5 षटकात जवळपास 70 धावा केल्या यावरून याचा अंदाज लावता येतो. अशाप्रकारे अखेरच्या षटकात सामना यूपी वॉरियर्सच्या हातातून गेला. तसेच, मुंबई इंडियन्सचा संघ 20 षटकांत 4 विकेट गमावून 182 धावांपर्यंत मजल मारू शकला.
यूपी वॉरियर्सच्या फलंदाजांतील चूका
यूपी वॉरियर्सच्या फलंदाजांनी त्यांच्या फलंदाजीनेही निराशच केले. विशेषत: या संघाच्या अव्वल फळीतील फलंदाजांनी बेजबाबदार शॉट निवडीमुळे विकेट गमावल्या. अशा प्रकारे, सतत विकेट गमावल्यामुळे, यूपी वॉरियर्सचा संघ मोठ्या लक्ष्यापासून दूर राहिला. याशिवाय पॉवरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी तगड्या गोलंदाजीचे दर्शन घडवले. अशा प्रकारे यूपी वॉरियर्सचे लक्ष्य दूर होत राहिले.
सामन्याचा लेखा-जोखा
Nat Sciver-Brunt च्या 72 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 182 धावांचा डोंगर उभारला. यात्सिका भाटिया हिने 21 तर हेली मॅथ्युज हिने 26 धावांचे योगदान दिले. हरमनप्रीत कौर 14 तर अमेलिया केर हिने 29 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून सोफियाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर अंजली सरवनी आणि पी चोप्रा हिने एक एक एक विकेट घेतली. मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युपीची सुरुवात निराशाजनक झाली. श्वेता शेरावत अवघ्या एका धावेवर तंबूत परतली. त्यानंतर ताहिला सात धावा काढून बाद झाली. त्याशिवाय एलिसा हेली 11 धावा काढून बाद झाली. किरन नवगिरे हिने सर्वाधिक 43 धावांचे योगदान दिले. ग्रेस हेरिस 14, दिप्ती शर्मा 16 यांनी छोटेखानी खेळी केली. पण इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. परिणामी युपीचा संघ 17.4 षटकात 110 धावांत सर्वबाद झाला. ज्यामुळे मुंबईचा संघ 72 धावांनी विजयी झाला.
हे देखील वाचा-