IND vs AUS, Test Proabable 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला आणि दुसरा सामना जिंकून भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ज्यानंतर आता उद्यापासून (1 मार्च) मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारत अधिक बदल करण्याची शक्यता नाही, कारण सध्या भारताचा खेळ चांगला होत आहे. मात्र सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) सतत फ्लॉप कामगिरी करत असल्याने त्याला वगळलं जाऊ शकतं. नुकत्याच झालेल्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात तुफान फॉर्म दाखवलेल्या शुभमन गिलला (Shubhman Gill) सलामीची संधी दिली जाऊ शकते. केएल राहुलने मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये केवळ 12.67 च्या सरासरीने 38 धावा केल्या आहेत.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलियाची ताकद वाढणार
तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात बरेच बदल पाहायला मिळतील. सर्वप्रथम, पॅट कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ संघाची धुरा सांभाळणार आहे. त्याचबरोबर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या जागी ट्रेव्हिस हेड दिसणार आहे. वॉर्नर दुखापतीशी झगडत आहे. त्याचबरोबर स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांचे पुनरागमन जवळपास निश्चित झालं आहे. ग्रीन आणि स्टार्क चांगल्या फॉर्मात असल्याने तिसऱ्या सामन्यात पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाची ताकद कुठेतरी वाढण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी / लान्स मॉरिस, मॅथ्यू कुह्नेमन, नॅथन लायन
कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
WTC Final मध्ये एन्ट्रीसाठी भारताला विजय महत्त्वाचा
तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. सध्या, टीम इंडिया 64.06 च्या विजयाच्या टक्केवारीसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया 66.67 विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-