IND vs BAN 1st Test Win reasons : भारत विरुद्ध बांगलादेश (India vs bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं तब्बल 188 धावांनी विजय मिळवला आहे.या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते केवळ 324 धावा करु शकले. ज्यामुळे भारतानं 188 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली, दरम्यान भारताच्या या दमदार विजयामागील तसंच बांगलादेशच्या पराभवामागील प्रमुख कारण जाणून घेऊ...
भारताच्या विजयाची कारणं
1.दमदार फलंदाजीचं प्रदर्शन
पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं शानदार फलंदाजी केली. सामन्याच्या पहिल्या डावात पुजारा, गिल, अय्यर, अश्विन आणि कुलदीप यादव यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो की पळो केलं. भारताकडून या सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनी शतकं झळकावली. या दोन्ही फलंदाजांनी सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार शतकी खेळी करत सामन्यातील भारताची स्थिती मजबूत केली. तर पहिल्या डावात श्रेयस-पुजारानं मोठी भागिदारी करत कुलदीप-अश्विननं एक संयमी खेळी केली.
2.गोलंदाजीत कुलदीप, अक्षरसह सिराजची कमाल
सामन्यात फलंदाजीसोबतच टीम इंडियाच्या गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. संघासाठी पहिल्या डावात दमदार पुनरागमन करणाऱ्या कुलदीप यादवने पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याचवेळी सिराजने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशचे कंबरडे मोडले. सामन्यात कुलदीप यादवने एकूण 8, अक्षर पटेलने 5 आणि मोहम्मद सिराजने एकूण 4 बळी घेतले.
बांगलादेशच्या पराभवाची कारणं
1.खराब फलंदाजी
बांगलादेश संघाच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांची पहिल्या डावातील फलंदाजी. भारताचा पहिला डाव 404 धावांवर आटोपल्यानंतर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात अवघ्या 150 धावांत सर्वबाद झाला. पहिल्या डावात बांगलादेशी फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर खूप संघर्ष करताना दिसले. विशेष म्हणजे पहिल्या डावात बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा आकडाही गाठता आला नव्हता. स्वस्तात पहिला डाव गडगडल्यामुळे भारताने बांगलादेशवर मोठी आघाडी घेतली आणि अखेर सामना जिंकला.
सुमार गोलंदाजी
बांगलादेश संघाच्या पराभवाचं आणि एक प्रमुख कारण म्हणजे संघाची सुमार गोलंदाजी. पहिल्या डावात बांगलादेश संघाने टीम इंडियाच्या 4 प्रमुख फलंदाजांना केवळ 112 धावांवर बाद केले. बांगलादेशी संघ भारताला मोठी धावसंख्या करू देणार नाही, असं वाटत होतं. मात्र यानंतर पुजारा आणि अय्यरने मोठी भागीदारी करत भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले. त्यानंतर, दुसऱ्या डावातही बांगलादेशी गोलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. त्यांना टीम इंडियाचे केवळ 2 विकेट घेता आले. बांगलादेशच्या कमकुवत गोलंदाजीचा फायदा घेत भारताने सामना जिंकला.
हे देखील वाचा-