Fans Climb Trees To Watch Virat Kohli पर्थ : भारतीय क्रिकेट संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारतीय खेळाडूंकडून सराव सुरु करण्यात आला आहे. भारतीय खेळाडंनी पर्थमध्ये सराव सुरु करण्यात आला आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियात देखील विराट कोहलीची क्रेझ दिसून येत आहे. विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडू पर्थमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल आहेत. या व्हिडीओत भारतीय खेळाडू नेट प्रॅक्टीस करत आहेत. भारताच्या क्रिकेट खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी अनोखी आयडिया वापरली. विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहते झाडावर चढले आहेत.  


फॉक्स क्रिकेटनं विराट कोहलीचा नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विराट कोहलीसह चाहते देखील पाहायला मिळत आहेत. फॉक्स क्रिकेटनं त्यांच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की विराट कोहलीची झलक पाहण्यासाठी चाहते अधिक अंतरावर जाऊन थांबले. विराट कोहलीशी संंधित हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. 



विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ऑस्ट्रेलियात बालदिन साजरा केला. दोघांनी या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ते फोटो देखील व्हायरल होत आहे. विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियात या मालिकेत चार सामने होणार आहेत. जागतिक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघाला 4-0 अशी मालिका जिंकणं आवश्यक आहे. पर्थमध्ये 22 नोव्हेंबरपासून पहिली कसोटी सुरु होणार आहे.  


रोहित शर्मा पहिल्या कसोटीमध्ये नसणार


भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीमध्ये खेळताना दिसणार नाही. वैयक्तिक कारणामुळं रोहित शर्मा पहिली कसोटी खेळणार नाही. रोहित शर्मा ऐवजी जसप्रीत बुमराह याला कर्णधारपद देण्यात आलं आहे.  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. भारतानं न्यूझीलंड विरुद्ध तीन कसोटी सामने गमावले होते. भारतातील फिरकी गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर टीम इंडियाच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नव्हती. सलग तीन पराभवांमुळं भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रवेशाचा  मार्ग खडतर बनला आहे.  






इतर बातम्या : 


गुड न्यूज, मोहम्मद शमीचा धमाका,रणजी स्पर्धेत जोरदार कमबॅक,ऑस्ट्रेलियाचं तिकीट मिळणार?