India Vs New Zealand 2nd Test : भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ खेळाडू केएल राहुल पुन्हा एकदा गरजेच्या वेळी फ्लॉप ठरला आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी केएल राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण पहिल्या डावाप्रमाणेच राहुल त्याच्या घरच्या मैदानावर दुसऱ्या डावातही फ्लॉप झाला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा पुण्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून केएल राहुलला वगळू शकतो. बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात शून्य धावा आणि दुसऱ्या डावात केवळ 12 धावा करून केएल राहुल बाद झाला.




सरफराज खान आणि ऋषभ पंत यांनी मिळून बंगळुरू कसोटीत भारताला जीवदान देण्याचे काम केले. बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात सरफराज खान आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी केली आणि न्यूझीलंडविरुद्ध भारताला आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सरफराज खानने 150 धावा केल्या, तर ऋषभ पंतने धावांची खेळी केली. सरफराज खान बाद झाला तेव्हा न्यूझीलंडविरुद्ध भारताची आघाडी 52 धावांची होती. यानंतर केएल राहुल जेव्हा क्रीझवर आला, तेव्हा तो ऋषभ पंतसोबत मोठी भागीदारी करेल आणि भारताला किमान 200 धावांची आघाडी देईल अशी अपेक्षा होती.




सरफराज खाननंतर ऋषभ पंत (99) बाद झाला तेव्हा संपूर्ण जबाबदारी केएल राहुल आणि रवींद्र जडेजावर होती. या क्षणी केएल राहुलने शरणागती पत्करली आणि 12 धावा करून बाद झाला. केएल राहुल बाद होताच भारताचा संपूर्ण डाव आटोपला. दुसऱ्या डावात भारताने शेवटच्या 7 विकेट केवळ 54 धावांत गमावल्या. 408/4 च्या स्कोअरसह टीम इंडियाचा डाव 462 धावांवर आटोपला.


केएल राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अयशस्वी ठरला आहे. 24 ऑक्टोबरपासून पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी जेव्हा शुभमन गिल टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतेल. तेव्हा केएल राहुलला संघातून वगळण्यात येईल. अशा परिस्थितीत सरफराज खान सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल, कारण 150 धावा केल्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळता येणार नाही. कसोटी सामन्यांमध्ये केएल राहुलने शेवटच्या 5 डावात 16, 22*, 68, 0 आणि 12 धावा केल्या आहेत. केएल राहुलने आतापर्यंत 53 कसोटी सामन्यांच्या 91 डावांमध्ये भारतासाठी 2981 धावा केल्या आहेत. केएल राहुलने या कालावधीत 8 शतके आणि 15 अर्धशतके केली आहेत. केएल राहुलचा कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या 199 धावा आहे. सरफराज खान कसोटी क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या केएल राहुलपेक्षा चांगला फलंदाज असल्याचे सिद्ध होईल.


हे ही वाचा -


Rohit Sharma Video Viral : रोहित शर्माला मिळाली RCBची ऑफर..., बंगळुरू कसोटीतील 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल