KL Rahul IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. संघात कायम ठेवणाऱ्या खेळाडूची यादीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून त्यात आता केवळ 13 दिवस उरले आहेत. दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने लखनऊची साथ सोडल्याची बातमी येत आहे. मेगा लिलावापूर्वी संजीव गोयंका यांना तो मोठा धक्का असू शकतात. यावेळी फ्रँचायझींना आयपीएलमध्ये जास्तीत जास्त 6 खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आता आयपीएल रिटेन्शन लिस्ट सादर करण्यासाठी केवळ 13 दिवस उरले आहेत. सर्व फ्रँचायझी त्यांच्या रणनीतीनुसार खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत बोलत आहेत. दरम्यान एका वृत्तानुसार, केएल राहुलला लखनऊ संघा सोबत जायचे नाही. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझी देखील त्याला कायम ठेवू इच्छित नाही. रिपोर्टनुसार, कोणते खेळाडू कायम ठेवावेत, त्यांची किंमत काय असावी याबाबत मतभेद आहेत. त्यामुळे केएल राहुल फ्रँचायझी सोडून मेगा लिलावात जाऊ शकतो.
केएल राहुल 2022 च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघात सामील झाला होता. त्याने संघासाठी 38 सामने खेळले असून त्यात त्याने 1410 धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली, संघ 2022 आणि 2023 हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरला. पण आयपीएल 2024 मध्ये लखनौची कामगिरी चांगली नव्हती. 14 पैकी 7 सामने जिंकून गुणतालिकेत ती 7व्या क्रमांकावर होती. त्याचवेळी, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर संघाचे मालक संजीव गोयंकाही राहुलला फटकारताना दिसले. यानंतर बराच वाद झाला होता.
ध्रुव जुरेलला राजस्थानने सोडले
केएल राहुलशिवाय ध्रुव जुरेलही मेगा ऑक्शनमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्स संघ त्याला कायम ठेवणार नाही. टीम इंडियासाठी कसोटी आणि टी-20 मध्ये पदार्पण करणारा यष्टिरक्षक फलंदाज जुरेल आयपीएलमध्ये राजस्थानकडून 28 सामने खेळला आहे. गेल्या हंगामात तो राजस्थानसाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळत होता. राजस्थानकडे जॉस बटलर आणि संजू सॅमसनच्या रूपाने आधीच दोन यष्टीरक्षक फलंदाज आहेत.
हे ही वाचा -
Rishabh Pant Injury Update : ऋषभ पंतला झाली गंभीर दुखापत, BCCIने दिले अपडेट, पहिल्या कसोटीतून बाहेर?