KL Rahul First Reaction Champions Trophy 2025 Title : केएल राहुल हा असाच एक भारतीय क्रिकेटपटू आहे... ज्याच्या कौतुकापेक्षा जास्त टीका होते, पण राहुल हा एकमेव खेळाडू आहे ज्याने कठीण परिस्थितीत प्रत्येक वेळी संघाला साथ दिली आहे. राहुलची भारतीय क्रिकेट संघात कोणतीही निश्चित भूमिका नाही पण तरीही, तो बदललेल्या भूमिकेत प्रत्येक वेळी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. 




2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी राहुलला सातत्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत असताना अनेक लोक प्रश्न उपस्थित करत होते. पण आता याच राहुलने भारताला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर राहुलनेही जबरदस्त प्रतिक्रिया दिली.




सामन्यानंतर राहुल म्हणाला की, या खेळाने मला मैदानात खूप चांगल्या आठवणी दिल्या आहेत आणि आजच्यासारख्या मोठ्या क्षणांसाठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळही दिला आहे. आता ते शब्दात सांगणे कठीण आहे, पण हा सर्व स्किलचा विषय आहे आणि आपण लहानपणी कसे क्रिकेट खेळलो याबद्दल आहे. यादरम्यान,जेव्हापासून मी बॅट उचलली आणि क्रिकेटपटू खेळायला सुरूवात केली, तेव्हापासून खूप अडचणी आल्या. आणि अजून पण दबावाचा सामना करावा लागत आहे.




सध्या, एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून कोण खेळणार यावरील वादविवाद संपताना दिसत आहेत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सातत्याने सांगत आहेत की राहुलची एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे, त्यामुळे त्याला संधी मिळतील. 


ऋषभ पंतला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यासोबतच इंग्लंडविरुद्धच्या घरच्या एकदिवसीय मालिकेतही त्याला दुर्लक्षित करण्यात आले. आता अशा परिस्थितीत पंतला एकदिवसीय संघात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये परतणे खूप कठीण वाटते. राहुलने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्रशिक्षक आणि कर्णधाराला सातत्याने प्रभावित केले आहे. अशा परिस्थितीत, राहुलने किमान या फॉरमॅटमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.


हे ही वाचा - 


Rohit Sharma Celebration Dubai : माँ तुझे सलाम! बार्बाडोसमध्ये गाडला होता तिरंगा, आता दुबईच्या खेळपट्टीवर रोहित शर्माने कसं केलं सेलिब्रेशन? पाहा डोळे भरून आणणारे Photo