King virat Kohli : रनमशीन विराट कोहली याच्या बॅटमधून यंदाच्या विश्वचषकात धावांचा पाऊस पडत आहे. विराट कोहली यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू झालाय. विराट कोहलीने नऊ डावात 594 धावांचा पाऊस पाडलाय. विराट कोहलीने 99.00 च्या सरासरीने धावा चोपल्यात. विराट कोहली यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज झालाय. बेंगलोरमध्ये नेदरलँड्सविरोधात अर्धशतकी खेळी करत विराट कोहलीने क्विंटन डि कॉकला मागे टाकले.
यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीची बॅट तळपली आहे. विराट कोहलीने नऊ डावात 7 वेळा 50 पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. त्याला फक्त दोन वेळा अपयश आलेय. पाकिस्तानविरोधात विराट कोहली 16 धावांवर बाद झाला होता. तर इंग्लंडविरोधात विराट कोहलीला खातेही उघडता आले नव्हते. या दोन सामन्याचा अपवाद वगळता विराट कोहलीने शानदार कामगिरी केली. विराट कोहलीने नऊ सामन्यात 594 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतके आणि दोन शतकांचा समावेश आहे. सेमीफायनल आणि फायनल... दोन सामन्यात विराट कोहली किती धावा काढतो.. याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
नेदरलँड्सविरोधात अर्धशतक -
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी वादळी सुरुवात केल्यानंतर विराट कोहलीनेही वेगाने धावा काढल्या. विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. विराट कोहलीने 56 चेंडूत एक षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. विराट कोहलीने अय्यरसोबत महत्वाची भागिदारी केली. विराट कोहलीने चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वेगाने वाढवली.
विश्वचषकात विराट कोहलीने कोणत्या संघाविरोधात किती धावा चोपल्या -
ऑस्ट्रेलिया - 85
अफगाणिस्तान - नाबाद 55
पाकिस्तान - 16
बांगलादेश - नाबाद 103
न्यूझीलंड - 95
इंग्लंड - 0
श्रीलंका - 88
दक्षिण आफ्रिका - नाबाद 101
नेदरलँड्स - 51
विश्वचषकात कुणाच्या नावावर किती धावा ?
यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहली 594 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. क्विंटन डि कॉकने 591 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा रचिन रविंद्र आहे. त्याने 565 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने 503 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर 499 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.