भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी-20 मालिका खेळवली गेली. टीम इंडियाने ही मालिका 3-1 ने जिंकली. या संपूर्ण मालिकेत भारतीय संघ विश्वविजेत्या संघासारखा खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या चार सामन्यांपैकी टीम इंडियाने तीनमध्ये 200+ धावा केल्या. मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम फलंदाजी करत अनेक विक्रम केले. चौथ्या टी-20 सामन्याचे हिरो होते तिलक वर्मा आणि संजू सॅमसन. दोन्ही फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली आणि शेवटच्या टी-20 सामन्यात दोघांनी नाबाद शतकी खेळी खेळली, त्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने तिलक वर्मा आणि संजू सॅमसन कौतुक केलं.


कामरान अकमल तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांचे कौतुक करताना म्हणाला, दक्षिण आफ्रिकेत भारताच्या युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी. वरिष्ठ खेळाडू नव्हते, पण भारतीय युवा खेळाडू कोणाला घाबरले नाही. संजू दोनदा शून्यावर आऊट झाला पण नंतर शामदार शतक ठोकले. त्याकडे टॅलेंट आहे, आता संजूची जागा संघात पक्की झाला, आता यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल यांना संधी मिळने कठीण दिसत आहे. संजूने या मालिकेचा पुरेपूर फायदा घेतला. 


तिलक वर्माबद्दल बोलताना कामरान अकमल म्हणाला की, इमर्जिंग आशिया कपमध्ये तिलक वर्माला काय झाले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो ज्या प्रकारे खेळा, त्याच्या अर्धा तरी तो इमर्जिंग आशिया कपमध्ये खेळला असता तर भारत जिंकला असता. पण कर्णधार सूर्याकुमार यादवने त्याच्यासाठी बलिदान दिले आणि तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्माला संधी दिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिलक वर्माने अवघ्या 47 चेंडूत 120 धावांची नाबाद खेळी केली. तर संजू सॅमसनने 56 चेंडूत 109 धावा केल्या.  


संजू आणि तिलक वर्मा यांनी अनेक विक्रम


टीम इंडियाचे स्टार फलंदाज संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात शतके झळकावली. या दोन फलंदाजांच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने 20 षटकात एक विकेट गमावून 283 धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांनी या सामन्यात अनेक विक्रमही केले. 


कसा झाला सामना?


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. जिथे टीम इंडियाने 20 षटकात केवळ एक विकेट गमावून 283 धावा केल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीला आला. 284 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 18.2 षटकांत 148 धावांत सर्वबाद झाला. यासह टीम इंडियाने हा सामना आणि मालिका जिंकली.