Continues below advertisement

MCA Election Result : मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची निवड करण्यात आली आहे. आव्हाडांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव केला. तर सचिव पदावर उन्मेष खानविलकर यांनी विजय मिळवला असून त्यांनी शाह आलम शेख यांचा पराभव केला. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली असून त्यांनी गौरव पय्याडे यांचा पराभव केला. एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची या आधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

Mumbai Cricket Association Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निकाल -

उपाध्यक्ष - जितेंद्र आव्हाड 203 विजयी वि. नवीन शेट्टी 155

Continues below advertisement

सचिव - उन्मेष खानविलकर 227 विजयी वि. शाह आलम शेख 129

संयुक्त सचिव - निलेश भोसले 228 विजयी वि. गौरव पय्याडे 128

खजिनदार - अरमान मलिक 237 विजयी वि. सुरेंद्र शेवाळे 119

मुंबई टी20 गव्हर्निंग कौन्सिल मेंबर

भरत किणी 184 विजयी वि. किशोर जैन

MCA Election Final Result : ॲपेक्स कौन्सिल (नऊ विजयी उमेदवार आणि मतं)

कदम विघ्नेश- 242

नदीम मेमन- 198

मिलिंद नार्वेकर- 242

भूषण पाटील- 208

विकास रेपाळे- 185

सूरज समत- 246

सावंत नील- 178

संदीप विचारे- 247

प्रमोद यादव- 186

या आधी अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर इतर कार्यकारिणीसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यामध्ये बैठक होऊन काही नावे निवडण्यात आली होती. मात्र रात्रीमध्ये काही घडामोडी घडल्या. अजिंक्य नाईक यांनी लावलेल्या होर्डिंगमध्ये आशिष शेलार गटाला अपेक्षित काही नावे नव्हती. त्यामुळे त्यासाठी पुन्हा निवडणूक लागली.

निवडून आलेल्या नव्या कारकारिणीमध्ये अजिंक्य नाईक यांच्या नेतृत्वात लढलेले 12 जण निवडून आले. तर आशिष शेलार यांच्याशी संबंधित चार जणांनी विजय मिळवला.

या निकालानंतर एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "ही आमच्या मैदान क्लब्स, सचिव आणि प्रत्येक महिला व पुरुष क्रिकेटपटूंच्या एकत्रित परिश्रमांची विजयगाथा आहे. हा विजय संपूर्ण मुंबई क्रिकेट परिवाराचा आहे, आपल्या शहराच्या क्रिकेट परंपरेचा अभिमान आहे.

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या मजबूत पाठिंब्यामुळेच हा यशाचा प्रवास शक्य झाला. तसेच आशीष शेलार यांच्या सततच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक आभार."

ही बातमी वाचा: