Continues below advertisement

मुंबई : मी क्रिकेटमधला एक साधा कार्यकर्ता आहे. कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि आशिष शेलार यांना वाटलं मी योग्य खेळाडू आहे, त्यामुळे एमसीएच्या अध्यक्षपदासाठी (MCA President) माझी निवड झाली, अशी पहिली प्रतिक्रिया अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांनी दिली. अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

MCA President : सर्वांनी विश्वास दाखवला

अजिंक्य नाईक म्हणाले की, "आव्हान स्वीकारायचं किंवा नाही स्वीकारायचं हा प्रश्नच येत नाही. कारण हा एक खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेगवेगळी परिस्थिती येते, आम्ही या परिस्थितीला सकारात्मक पद्धतीने सामोरे गेलो. जर मतदारांचा पाठिंबा असेल तर मला वाटत नाही कुठलं आव्हान कठीण असेल. प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, सरनाईक हे सीनियर मेंबर आहेत. त्यांच्याकडे मी शिकत असतो. त्यांचा सपोर्ट मिळणं हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास दाखवला."

Continues below advertisement

Ajinkya Naik MCA President : महत्त्वाच्या ठिकाणी सॅटेलाईट अकॅडमी

अजिंक्य नाईक म्हणाले की, "अमोल काळे यांची मला नेहमी आठवण येते. आज मुंबई क्रिकेट असोसिएशनचं नाव जगभरात घेतले जाते. शरद पवार क्रिकेट म्युझियम हे जगभरात ओळखले जाते. ठाणे कळवामध्ये आम्ही पहिली सॅटेलाइट अकॅडमी सुरू करत आहोत. एमएमआरडीए मधील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यांमध्ये सॅटेलाइट अकॅडमी सुरू करण्याचा उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन संकल्पना, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता येईल. सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि सल्ल्याने इन्फ्रास्ट्रक्चर अकॅडमी नक्की उभी करू."

MCA President Election : अजिंक्य नाईक यांची बिनविरोधन निवड

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची आज बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदाच्या शर्यतीतील इतर उमेदवारांनी माघार घेतल्यानं अजिंक्य नाईक एमसीएचे अध्यक्ष म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून आले. प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, विहंग सरनाईक, मिलिंद नार्वेकर, शाह आलम शेख आणि डायना एडुलजी यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे अजिंक्य नाईक यांची या पदावर बिनविरोध निवड झाली.

ही बातमी वाचा :