मुंबई : अफगानिस्तानचा गोलंदाज राशिद खान (Rashid khan) सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. कारण, त्याच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असून पत्नीसमवेतचा त्याचा फोटोही व्हायरल झाला आहे. नेटीझन्सकडून (Netizens) राशिदचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या जात आहेत. काळ्या ड्रेसमध्ये गोरी गोरी पान, फुलासारख्या छान सुंदरीचे राशिद खानसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता गोंलदाजाने स्वत:च आपल्या दुसऱ्या लग्नाबाबत (Marriage) खुलासा केला आहे. रशिद खानचा महिलेसोबतचा फोटो हा नेदरलँडमधील असल्याचे सांगण्यात येते, जिथे राशिदने एका चॅरिटी इव्हेंट लाँच सोहळ्यात सहभाग घेतला होता. तरुणी समवेतचा राशिद खानचा या सोहळ्यातील फोटो व्हायरल होताच नेटीझन्सने राशिदच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू केली आहे. मात्र, या चर्चेसंदर्भात आता स्वत: राशिद खानने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन माहिती दिली.
राशिद खान याबाबत बोलताना म्हणाला, 2 ऑगस्ट 2025 रोजी माझ्या आयुष्यातील एका नव्या आणि अतिशय महत्त्वपूर्ण अध्यायाला सुरुवात झाली. याच दिवशी माझं लग्न झालं, जी माझ्यासाठी नेहमीच प्रेम, समाधान आणि खऱ्या जोडीदाराच उदाहरण राहिली, तिच्याशी माझा निकाह झालाय, असे म्हणत राशिदने त्याच्या पत्नीचंही भरभरुन कौतुक केलंय. मी एका चॅरिटी इव्हेंटमध्ये सहभागी झालो होतो, मात्र एवढ्या लहान गोष्टीवरुन अनेकांनी चुकीचे मेसेज, अफवा आणि अंदाज लावायला सुरुवात केली. सरळ आणि स्पष्ट आहे की, ती माझी बायको आहे. आम्ही प्रामाणिकपणे आणि खुल्या मनाने एकमेकांसोबत ठामपणे उभे आहोत. जे लोक आमच्यासाठी प्रार्थना करत आहेत, अभिनंदन करत आहेत, मनापासून आम्हाला सपोर्ट करत आहेत, त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद, अशी भलीमोठी पोस्ट राशिद खानने इंस्टा अकाऊंटवरुन शेअर केली आहे. त्यामुळे, राशिदसोबत असलेली ती सुंदरी ही त्याची पत्नीच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
व्हायरल झालेला फोटो, सोशल मीडियावर गोंधळ
राशिद खानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका सुंदर महिलेसोबत दिसत आहे. असे सांगितले जात आहे की, हा फोटो नेदरलँडमधील आहे, जिथे राशिद एका चॅरिटी इव्हेंटच्या लॉन्चिंगला उपस्थित होता. फोटो समोर येताच, चाहत्यांनी अंदाज लावण्यास सुरुवात केली की राशिदने दुसरे लग्न गुपचूप केले आहे.
पहिल्या लग्नाच्या आठवणी ताज्या
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये राशिद खानने त्याच्या तीन भावांसोबत एकाच दिवशी निकाह केला होता. लग्न पख्तून परंपरेनुसार पार पडले आणि या निकाहमध्ये अफगाणिस्तान संघातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते. त्यावेळी राशिदने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली होती. आता त्याने त्याच्या अलीकडील पोस्टमध्ये 2 ऑगस्ट 2025 ची तारीख सांगितली, तेव्हा लोकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली की हे दुसरे लग्न आहे की त्याच पत्नीसोबत धार्मिक विधीचे पुन: आयोजन.