JioHotstar Subscription Plans Champions Trophy : क्रिकेट चाहते आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्रिकेट जगतातील टॉप-8 संघ खेळताना दिसतील. अशा परिस्थितीत चाहत्यांना खूप रोमांचक सामने पाहायला मिळतील. पण त्याआधीच भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
खरंतर, डिस्ने हॉटस्टार आणि जिओ सिनेमा हे लाईव्ह स्ट्रीमिंग अॅप्लिकेशन आता एकत्र आले आहेत. या दोघांनी एकत्र येऊन जिओस्टार नावाचे एक नवीन अॅप्लिकेशन लाँच केले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने आता भारतात जिओ सिनेमा अॅपवर मोफत उपलब्ध असणार नाहीत. जर चाहत्यांना जिओस्टारवर लाईव्ह सामने पहायचे असतील तर त्यांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
Jiostar वसूल करणार पैसा...
जिओस्टारवर सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत 149 रुपये आहे, ज्याचा कालावधी 3 महिन्यांचा असेल. तुम्ही 499 रुपयांना वार्षिक सदस्यता खरेदी करू शकता. हा प्लॅन खरेदी करून वापरकर्ता फक्त एकाच डिव्हाइसवर लॉगिन करू शकेल.
प्रीमियम प्लॅन सर्वात महाग आहे, ज्याचे वर्षभर सबस्क्रिप्शन 1,499 रुपये आहे. प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतल्याने, एकाच वेळी 4 डिव्हाइसवर लॉग इन करता येईल आणि हा प्लॅन खरेदी केल्याने वापरकर्त्याला जाहिरातींपासून मुक्तता मिळेल. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने फक्त JioStar वर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार असल्याने, जर लोकांना सामने लाईव्ह पहायचे असतील तर त्यांना किमान 149 रुपयांचा सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावा लागेल.
जिओ सिनेमाने 2023 मध्ये आयपीएलच्या लाईव्ह स्ट्रीमिंगचे हक्क 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 23,758 कोटी रुपयांना खरेदी केले. दोन वर्षांपासून, चाहते जिओ सिनेमावर आयपीएल सामने मोफत पाहू शकत होते, परंतु आता डिस्नेसोबतच्या भागीदारीनंतर जिओने सामन्यांच्या लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. हा करार पाच वर्षांसाठी करण्यात आला होता, जो 2028 पर्यंत चालेल.
हे ही वाचा -