Team India against Bangladesh: भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार असून भारतीय संघात तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा स्थान मिळालेल्या जयदेवनं एक इमोशनल पोस्ट शेअर केलीच पण आता त्याच्या पत्नीनेही एक भावूक पोस्ट केली आहे. यातून जयदेवच्या भारतीय संघात पुनरागमनाचा पत्नी रिनीला फारच आनंद झाल्याचं दिसून येत आहे.
भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतानं आपला संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) या मालिकेतून तब्बल 12 वर्षांनंतर टीम इंडियात परतत आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद शमीच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान जवळपास 12 वर्षांनंतर उनाडकट पहिल्यांदाच कसोटी संघातून टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणार आहे. याआधी, त्याने डिसेंबर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली आणि शेवटची कसोटी खेळली होती. यानंतर त्याला पुन्हा संघात घेण्यात आलं नाही. आता पुन्हा एखदा संघात स्थान मिळाल्यावर जयदेवला टेस्ट किट देण्यात आलं. दरम्यान टेस्ट किट मिळाल्यावर जयदेव खूप आनंदी दिसत होता. यावेळीच त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. रिनीने इन्स्टाग्रामवर उनाडकटचे जर्सी दाखवतानाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'पत्नीसाठी गर्वाचे क्षण' असं कॅप्शन दिलं.
शमीच्या जागी जयदेवची निवड
भारताचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतीमुळं बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडलाय. त्याच्या जागी जयदेव उनाडकटचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला. 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जयदेव उनाडकट भारतीय कसोटी संघाचा भाग बनलाय. त्यानं 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये एकमेव कसोटी खेळली होती. जयदेवनं भारतासाठी आतापर्यंत 1 कसोटी, 7 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
भारताचा कसोटी संघ:
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.
हे देखील वाचा-