T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होईल. मात्र, यापूर्वीच भारताचा हुकमी ऐक्का आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर झालाय. जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात तो खेळणार नसल्याचं पीटीआयनं बीसीसीआयच्या सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलंय. त्यानंतर भारतीय चाहत्यांमध्ये निराशा पसरली असून अनेक अनुत्तरित प्रश्नांना वाचा फुटलीय.


बीसीसीआयचा निष्काळजीपणा भोवला?
जसप्रीत बुमराह गेल्या काही दिवसांपासून दुखापतग्रस्त आहे. ज्यामुळं आशिया चषकातही त्याला खेळता आलं नव्हतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतून त्यानं संघात पुनरागमन केलं. परंतु, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात जसप्रीत बुमराहला वगळण्यात आलं होतं. सरावदरम्यान त्याच्या पाठीला किरकोळ दुखापत झाल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं. मात्र, जसप्रीत बुमराहची दुखापत गंभीर असून तो टी- 20 विश्वचषकातून बाहेर पडल्याचं जाहीर करण्यात आलं. दरम्यान, जसप्रीत बुमराहची दुखापत गंभीर असतानाही त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवलं गेलं? दुखापत असतानाही तो कसा खेळला? बुमराहच्या दुखापतीला बीसीसीआयचा निष्काळजीपणा जबाबदार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 


मोहम्मद शामीचा फिटनेस ठरतोय चिंतेचा विषय
जसप्रीत बुमराहचं विश्वचषकातून बाहेर पडणं, भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याच्याजागी मोहम्मद शामाली भारतीय संघाच्या प्लेईंगमध्ये संधी मिळण्याची शक्यता वाढलीय. बुधवारी रात्री शामी कोरोनामुक्त झाल्याची बातमी समोर आली असली तरी शमी पूर्णपणे तंदुरुस्त आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विश्वचषकासारख्या स्पर्धेसाठी आवश्यक असलेला फिटनेस शमीकडं आहे का? विश्वचषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या चार राखीव खेळाडूंमध्ये शमीचा समावेश आहे. मात्र प्रश्न केवळ शमीच्या फिटनेसचा नाही, तर मॅच फिटनेसचाही आहे.


बुमराहचीऐवजी कोणाला संधी मिळणार?
टी-20 विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये दीपक चाहर आणि मोहम्मद शामी दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे, संघातील महत्वाचा खेळाडूला दुखापत झाल्यास राखीव खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवलं जातं. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत दीपक चाहरनं चांगली गोलंदाजी केलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात दीपक चाहरनं चार षटकात 24 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. परंतु, जसप्रीत बुमराहऐवजी कोणला भारतीय संघात संधी मिळेल? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दीपक चाहर, मोहम्मद शामी किंवा अन्य कोण? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.


बुमराहचा पर्याय त्याची भरपाई करेल का?
बुमराह जगातील स्टार वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे, यात काही शंका नाही. बुधवारीच मार्क वॉने बुमराहला विश्वचषकातील पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान दिलं. दरम्यान, बुमराहऐवजी भारतीय संघात स्थान मिळवणारा खेळाडू त्याची भरपाई करेल का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न असेल.


हे देखील वाचा-