Road Safety World Series 2022: भारतात सध्या रोड सेफ्टी सीरीजचा दुसरा हंगाम खेळवला जातोय. या स्पर्धेत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा जुना अंदाज पाहायला मिळाला. या स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नेतृत्वाखाली इंडिया लीजेंड्सनं (India legends) सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया लीजेंड्सचा (Australia Legends) पराभव करून फायनलचं तिकीट मिळवलंय. या सामन्यात भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाची (Suresh Raina) जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. त्यानं बेन डंकचा अशक्य असलेला झेल पकडून वय म्हणजे फक्त आकडे असल्याचं दाखवून दिलं. ज्या व्हिडिओ भारताचा माजी क्रिकेटपटू अमित मिश्रानं (Amit Mishra) ट्विट करत सुरेश रैनाचं कौतूक केलं. परंतु, या ट्विटला एका चाहत्यानं केलेला रिप्लाय पाहून आमित मिश्रा आश्चर्यचकीत झाला. ज्यात संबंधित चाहत्यानं गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी आमित मिश्राकडं 300 रुपयांची मागणी केली. अमित मिश्रानंही त्याच्या मागणीला प्रतिसाद देत चाहत्याला त्याच्या मागणीपेक्षा जास्त पैसे पाठवले . 


अमित मिश्रा सध्या आपल्या मजेशीर ट्विटमुळं खूप चर्चेत आलाय. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये सुरेश रैनाचा झेल पाहून तो देखील आश्चर्यचकित झाला. ज्याचा व्हिडिओही त्यानं ट्विटरवर शेअर केला. त्यावेळी ट्विटवर एका चाहत्यानं गर्लफेंडला फिरवण्यासाठी अमित मिश्राला 300 रुपये मागितले. त्यानंतर अमित मिश्रानंही कशाचाही विचार न करता त्याला 500 रूपये गूगल पे केले. ज्याचा स्क्रीनशॉट स्वत: अमित मिश्रानं सोशल मीडियावर शेअर केला. अमित मिश्राचा हा स्क्रीनशॉर्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. 


ट्वीट-






 


ट्वीट-






 


इंडिया लीजेंड्सचा ऑस्ट्रेलिया लीजेंड्सवर पाच विकेट्सनं विजय
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात इंडिया लीजेंड्सनं ऑस्ट्रेलिया लीजेंड्सचा (India Legends vs Australia Legends) पाच विकेट्सनं पराभव करून फायनलमध्ये धडक दिलीय, जिथे त्यांचा सामना वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील विजेत्याशी होईल. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया लीजेंड्सनं 20 षटकांत 5 बाद 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात नमन ओझाच्या नाबाद 90 धावा आणि त्यानंतर इरफान पठाणच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर इंडिया लीजेंड्सनं 4 चेंडू आणि पाच विकेट्स राखून ऑस्ट्रेलिया लीजेंड्सचा पराभव केलाय.


रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा अंतिम सामना कधी, कुठं रंगणार?
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा दुसरा सेमीफायनल सामना उद्या (30 सप्टेंबर) वेस्ट इंडीज लीजेंड्स आणि श्रीलंका लीजेंड्स यांच्यात  खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ 1 ऑक्टोबरला इंडिया लीजेंड्सच्या संघाशी भिडेल. हा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 


हे देखील वाचा-