India vs Pakistan Asia Cup Final 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप फायनल दुबईमध्ये सुरू आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी खेळाडू हरिस रौफला चोख प्रत्युत्तर दिले आहे. बुमराहने रौफला क्लीन बोल्ड केले आणि पाकिस्तानी खेळाडूला त्याच्याच भाषेत सेलिब्रेशनने उत्तर दिले.
जसप्रीत बुमराहचं हरिस रौफला चोख प्रत्युत्तर (Jasprit Bumrah Plane Celebration Slams Haris Rauf )
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हरिस रौफला बोल्ड करत पाकिस्तानचा नववा गडी टिपला. हरिस रौफला बाद केल्यानंतर बुमराहने त्याला खास शैलीत चिडवलं. यामागची गोष्ट अशी की, याआधीच्या सामन्यात हरिस रौफने विमान पाडल्यासारखा इशारा करून जल्लोष केला होता. यावेळी बुमराहने त्याला आऊट करत, तसेच उत्तर देत सेलिब्रेशन केलं. हरिस रौफ 4 चेंडूत एक चौकाराच्या मदतीने सहा धावा करून बाद झाला.
बुमराहचं सेलिब्रेशन अन् इरफान पठानचा पाकला टोला
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तानचा खेळाडू हरिस रौफला बाद करताच माजी क्रिकेटपटू इरफान पठाननेही सोशल मीडियावर त्याला टोला लगावला. इरफान पठानने एक्सवर लिहिले – “बुमराहने फ्लाइट लँड करून दाखवली.”
आशिया कपच्या सुपर-4 सामन्यात हरिस रौफ केवळ खेळाडूंनाच नाही, तर सामन्याला आलेल्या भारतीय प्रेक्षकांनाही भडकवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर त्याने मैदानात ‘6-0’ असा इशारा करून वाद निर्माण केला होता. मात्र त्याच्या अशा लाजिरवाण्या वागणुकीनंतरही पाकिस्तानला भारताकडून 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी आपल्या फलंदाजीने हरिस रौफला योग्य उत्तर दिले होते. आणि आता अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहनेही त्याचा हिशोब चुकता केला. रऊफला बुमराहच्या चेंडूचा काहीच अंदाज आला नाही आणि तो अवघ्या 4 चेंडूत 6 धावा करून माघारी परतला.
हे ही वाचा -