IND vs PAK Playing 11 Asia Cup 2025 Final : आशिया कप 2025 चा अंतिम सामना क्रिकेट चाहत्यांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमनेसामने आले आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी, भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मागील सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या अंतिम फेरीतून बाहेर पडावे लागले आहे.
हार्दिक पांड्या बाहेर, पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग-11 मध्ये 3 मोठे बदल
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळणार नाही. भारताने तीन बदल केले. हार्दिकची जागा रिंकू सिंगने घेतली. दरम्यान, अर्शदीप सिंगची जागा जसप्रीत बुमराहने घेतली आणि हर्षित राणाची जागा शिवम दुबेने घेतली. या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये पाकिस्तानने कोणतेही बदल केलेले नाहीत.
अंतिम सामन्याच्या काही मिनिटांपूर्वीच भारताला मोठा धक्का
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या या महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. हार्दिकला मागील सामन्यात दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याच्या जागी युवा फलंदाज रिंकू सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याच्या स्फोटक फलंदाजी आणि फिनिशर कौशल्यासाठी ओळखला जाणारा रिंकू या स्पर्धेतील पहिलाच सामना खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा फायनल केवळ एक सामना नाही तर दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांसाठी भावनांचे वावटळ आहे. पण, या मोठ्या सामन्यापूर्वी पांड्याची दुखापत संघासाठी मोठा धक्का आहे. तो सध्याच्या संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडूंपैकी एक आहे आणि संघाच्या वेगवान गोलंदाजीत त्याची महत्त्वाची भूमिका आहे. परिणामी, टीम इंडियाला शेवटच्या क्षणी आपले नियोजन बदलावे लागले आहे.
पाकिस्तान संघाची प्लेइंग-11 : साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसेन तलत, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
भारतीय संघाची प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.