Jasprit Bumrah Sam Konstas Wicket Celebration : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. यामध्ये एक क्षण तुम्ही राजासारखं सिंहासनावर असतात आणि दुसऱ्या क्षणी तुम्ही जमिनीवर. मेलबर्न कसोटीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सॅम कॉन्स्टासला हे लागू होते. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात या 19 वर्षीय फलंदाजाने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले, यादरम्यान त्याने खासकरून भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला टार्गेट केले.
कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहच्या एका स्पेलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कॉन्स्टासने केला होता, पण आता दुसऱ्या डावात या वेगवान गोलंदाजाने ऑस्ट्रेलियन फलंदाजाला स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवून त्याचा बदला घेतला. बुमराहनेही ही विकेट खास पद्धतीने सेलिब्रेट केली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा अतिशय शांत स्वभावाचा मानला जातो, आणि विकेट घेतल्यानंतर जास्त सेलिब्रेशन करत नाही. पण सॅम कॉन्स्टासला आऊट केल्यानंतर, त्याने भन्नाट सेलिब्रेशन केलं. कॉन्स्टासने पहिल्या डावात बुमराहविरुद्ध 33 चेंडूत 34 धावा केल्या होत्या, पण दुसऱ्या डावात त्याला 8 चेंडूत केवळ 1 धाव करता आली.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाच्या सहाव्या षटकात बुमराहने कॉन्स्टाससाठी सेटअप तयार केला. त्याने ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर युवा फलंदाजाला चकवले, तर दुसरा चेंडूही त्याने बाहेरच्या दिशेने टाकला पण तिसरा चेंडू इन-स्विंग होता, ज्यात कॉन्स्टस फसला आणि क्लीन बोल्ड झाला. 18 चेंडूत केवळ 8 धावा करून कॉन्स्टास बाद झाला. अशाप्रकारे कांगारू संघाने 20 धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट गमावली.
जसप्रीत बुमराहने या स्टाईलमध्ये का केले सेलिब्रेशन?
पहिल्या दिवसापासून मेलबर्न कसोटी पाहत असलेल्या अनेक चाहत्यांना समजले असेल की जसप्रीत बुमराहने सॅम कॉन्स्टसला बाद केल्यानंतर असे सेलिब्रेशन का केले. खरं तर, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 60 धावा केल्यानंतर कॉन्स्टास आऊट झाला, तेव्हा त्याने पॅव्हेलियनमध्ये जाताना प्रेक्षकांना आवाज करण्याचा इशारा दिला. यानंतर तो भारताच्या डावात क्षेत्ररक्षण करताना सीमारेषेजवळ असेच करताना दिसला. यामुळे बुमराहने जेव्हा त्याला आपला शिकार बनवले तेव्हा त्याने त्याच शैलीत सेलिब्रेशन केले.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाला 43 धावांवर दुसरा धक्का बसला आहे. डीएसपी मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला क्लीन बोल्ड केले. ख्वाजाला 65 चेंडूत 21 धावा करता आल्या. यादरम्यान त्याने दोन चौकार मारले. सध्या मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ क्रीजवर आहेत. ऑस्ट्रेलियाची आघाडी सध्या 148 धावांची आहे.
हे ही वाचा -