Jasprit Bumrah Angry Airport Video : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील चौथा टी-20 सामना रद्द करण्यात आला आहे. बुधवारी (17 डिसेंबर) हा सामना लखनऊमधील एकाना स्टेडियमवर होणार होता. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील निकालाच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा होता. पण धुक्यामुळे सामना रद्द करण्यात आला. दरम्यान, सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बुमराह संतापलेला दिसत असून, त्यांनी एका चाहत्याचा फोन हिसकावून घेतल्याचे स्पष्ट दिसते. ही घटना विमानतळावरील असून, बुमराह रांगेत उभे असताना एका चाहत्याच्या वागण्यामुळे त्यांचा संयम सुटल्याचे व्हिडीओत पाहायला मिळते.
बुमराहने नेमकं कोणाचा फोन हिसकावला?
विमानतळावर बुमराह ज्या रांगेत उभा होता, त्याच शेजारी एक चाहता देखील उभा होता. बुमराह अगदी जवळ असल्याचे लक्षात येताच, त्या चाहत्याने कोणतीही परवानगी न घेता थेट सेल्फी व्हिडीओ काढायला सुरुवात केली. सुरुवातीला बुमराहने त्याला शांतपणे व्हिडीओ न काढण्याची सूचना केली आणि इशाराही दिला. मात्र, चाहत्याने ती सूचना दुर्लक्षित केल्याने बुमराह संतापला आणि त्याने त्याचा फोन हिसकावून फेकून दिला.
बुमराह आणि चाहत्यामधील नेमकी काय झाली बातचीत?
या घटनेदरम्यान बुमराह आणि चाहत्यामध्ये झालेली थोडक्यात बातचीत अशी होती.
फॅन : सर, मी आता तुमच्यासोबतच जाईन?बुमराह : फोन पडला तर मला दोष देणार का?फॅन : काही नाही सर.बुमराह : बरं आहे.
यानंतर बुमराह त्या चाहत्याचा फोन हिसकावून फेकतात आणि या घटनेचा शेवट होतो. हा सगळा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून सध्या तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
टी-20 मालिकेत बुमराहची कामगिरी
जसप्रीत बुमराह सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग आहे. कटक येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने 2 विकेट्स घेतल्या होत्या. मुल्लांपूरमधील दुसऱ्या टी-20 मध्ये मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. धर्मशाळेत खेळला गेलेला तिसरा टी-20 सामना बुमराह वैयक्तिक कारणामुळे खेळू शकला नाही. लखनऊतील चौथा टी-20 पावसामुळे रद्द झाला, तर मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना 19 डिसेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
हे ही वाचा -