IND vs SA ODI Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सध्या टी20 मालिका सुरु असून 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका  खेळवली जाणार आहे. दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताने आपला संघ जाहीर केला आहे. यावेळी टी-20 विश्वचषक जवळ आला असल्यानं भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत विश्रांती दिली गेली आहे. संघाचं नेतृत्त्व शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) तर उपकर्णधारपद श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे दिलं गेलं आहे. संघात आयपीएल 2022 गाजवणाऱ्या बऱ्याच युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे.

एकदिवसीय मालिकेत शिखर धवनकंड भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं गेल असून त्याने याधी वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारतीय एकदिवसीय संघाचं उत्तम नेतृत्व केलं होतं.  टी-20 विश्वचषकात संधी न मिळालेल्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत संधी मिळाल्याचं दिसून आलं आहे. तसंच आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. यामध्ये रजत पाटीदार, मुकेश कुमार, शाहबाज अहमद अशा खेळाडूंचा समावेश आहे. तसंच राहुल त्रिपाठीही संघात असून तो अंतिम 11 मध्ये असेल का हे पाहावं लागेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 6 ऑक्टोबर 2022 लखनौ
दुसरा एकदिवसीय सामना 9 ऑक्टोबर 2022 रांची 
तिसरा एकदिवसीय सामना 11 ऑक्टोबर 2022 दिल्ली

हे देखील वाचा -