IND vs WI 1st ODI : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेतील  (IND vs WI ODI Series) पहिला सामना सहा फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय एकदिवसीय संघात दोन खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी ईशान किशन आणि शाहरुख खान यांची भारतीय संघात निवड झाली आहे. 


पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ (Squad for the 1st ODI) - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, ईशान किशन, शाहरुख खान 





भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेतील  (IND vs WI ODI Series) पहिला सामना सहा फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. खेळाडूंनी कसून सराव करण्यास सुरुवात केली आहे. सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने ईशान किशन (Ishan Kishan) सलामीला खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. मुंबई इंडियन्ससाठी रोहित आणि ईशान यांनी सलामीची भूमिका पार पाडली आहे. आता भारतीय संघासाठी रोहित-ईशान सलामीची भूमिका पार पाडणार आहे. 


 केएल राहुलने पहिल्या एकदिवसीय सामन्यातून माघार घेतली आहे. तर शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे सलामीसाठी ईशान किशनला निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ईशान किशनची एकदिवसीय संघामध्ये निवड झालेली नव्हती. पण तो टी-20 संघाचा भाग होता. काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर निवड समितीने ईशान किशनची एकदिवसीय संघात निवड केली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर ईशान किशन थेट बायोबबलमध्ये संघासोबत होता, त्यामुळे ईशान किशनची निवड करण्यात आली आहे.  


वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा टी20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.  


कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बीसीसीआयने तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि तीन टी-20 सामने दोनच मैदानांवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही टी-20 सामने कोलकात्यात खेळवले जातील.  


वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक 
एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद


टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता