Rohit Sharma Ajit Agarkar PC : टी20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्ये विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न विचारण्यात आला. विराट कोहलीच्या खेळावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर रोहित शर्मानं दिलेली रिअॅक्शन सध्य चर्चेचा विषय आहे. विराट कोहलीच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर रोहित शर्मानं हसत प्रतिक्रिया दिली. 2020-21 च्या विश्वचषकावेळी विराट कोहली कर्णधार असताना पत्रकारांनी रोहित शर्माच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी विराट कोहलीला हसू आवरले नव्हते. त्यावेळी विराट कोहलीनं रोहित शर्माचं कौतुक केले होते. आजही तशीच परिस्थिती आली होती, त्यावेळी रोहित शर्मानं विराट कोहलीच्या फलंदाजीचं कौतुक केले. त्याशिवाय तो सध्या लयीत आहे, असेही सांगितलं. अजित आगरकर यानेही विराट कोहलीच्या खेळावर प्रश्न उपस्थित कऱणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. 

विराट कोहलीचा स्ट्राईक रेट चिंतेचा विषय? 

आयपीएलमध्ये विराट कोहलीनं संथ शतक केले होते. तेव्हापासून त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. तो फिरकीविरोधात धावा काढू शकत नाही, असेही सांगण्यात येत होते. विराट कोहलीने सर्वांना फलंदाजीनं उत्तर दिलं. पण तरीही आज विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना अजित आगरकर म्हणाला की, " विश्वचषकाचा संघ निवडताना सिलेक्टर्समध्ये विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर कोणतीही चर्चा झाली नाही. विराट कोहलीचा फॉर्म सध्या शानदार आहे. आयपीएलमध्ये तो धावांचा पाऊस पाडतोय. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटबाबत कोणतीही चिंता नाही."

विराट कोहली सलामीली येणार ?

विश्वचषकात विराट कोहली सलामीला येणार का? याप्रश्नाचं उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, खेळपट्टी आणि कंडिशन पाहिल्यानंतरच सलामीच्या जोडीचा विचार केला जाईल. आताच त्याबाबत बोलणं उचीत नाही.

रिंकू सिंहची निवड का नाही ?

रिंकू सिंह याच्याबाबत खूप विचार झाला. त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय कठीण होता. त्यानं कोणतीही चूक केली नाही. पण कॉम्बिनशन महत्वाचं आहे. त्याआधारावरच संघाची निवड कऱण्यात आली. संघाला एका अतिरिक्त गोलंदाजाची गरज होती. त्यामुळेच रिंकूची निवड झाली नाही. त्याला राखीव खेळाडूमध्ये ठेवण्यात आली आहे.