Irfan Pathan on Nitish Kumar Reddy नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानं  भारतीय क्रिकेटचा पुढील स्टार प्लेअर म्हणून नितीश कुमार रेड्डीचं नाव घेतलं आहे. नितीश कुमार रेड्डीला पहिल्या वनडेपासून संघात स्थान मिळायला पाहिजे होतं, असं इरफान पठाण म्हणाला. नितीश कुमार रेड्डी 135 किमी प्रति तास वेगानं गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करतोय त्यामुळं इरफान पठाणला त्याची कामगिरी आवडली आहे. भारताच्या क्रिकेट व्यवस्थापनानं नितीश कुमार रेड्डीला दीर्घ काळ सपोर्ट केला पाहिजे, असंही पठाण म्हणाला. 

Continues below advertisement

इरफान पठाण यानं त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना नितीश कुमार रेड्डीला भारतीय मॅनेजमेंटनं पाठिंबा देण्याचा सल्ला दिला. नितीश कुमार रेड्डी या मालिकेतील सकारात्मक पैलू राहिला. त्यानं फलंदाजीत अर्धशतक केलं. राजकोट आणि इंदौरमध्ये वॉशिंग्टन सुंदरचा पर्याय म्हणून त्याला संधी मिळाली. पहिल्या मॅचपासून त्याला संधी मिळायला हवी होती. नितीश कुमार रेड्डी 135 किमी प्रति तास वेगानं गोलंदाजी करतो, हार्दिक पांड्याचा चांगला बॅकअप तो असल्याचं इरफान पठाण यानं म्हटलं.  

नितीश कुमार रेड्डी अपयशी ठरला तरी टीम इंडियाच्या व्यवस्थापनानं त्याला सातत्यानं पाठिंबा द्ययाला पाहिजे. काही काळानंतर भारतीय टीमला चांगला ऑलराऊंडर मिळेल, असं इरफान पठाण यानं म्हटलं. 

Continues below advertisement

नितीश कुमार रेड्डीनं 2024 मध्ये टीम इंडियात पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्यानं 10 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्यानं एका शथकासह 396 धावा केल्या आहेत. तर, गोलंदाजीत 8 विकेट घेतल्या आहेत. आतापर्यंत त्याला 4 वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यात त्यानं एक अर्धशतक केलं आहे. याशिवाय त्यानं चार टी 20 मॅचमध्ये 90 धावा केल्यात आणि तीन विकेट घेतल्या आहेत.