कानपूर : भारतीय संघ (Indian Cricket Team) तब्बल दोन महिन्यानंतर कसोटी सामना खेळत आहेत. आधी आयपीएल मग विश्वचषक अशा टी20 क्रिकेटच्या ओव्हरडोसनंतर आज पुन्हा एकदा भारतीय संघ कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) भारताचा पराभव केलेल्या न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) भारत कसोटी सामना खेळत आहे. यावेळी विराट (Virat Kohli) विश्रांतीवर असल्याने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कर्णधारपद सांभाळत आहे. भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीने सामन्याची सुरुवात केली. दरम्यान दिवसाखेर भारताने दिलासादायक सुरुवात करत 4 विकेट्सच्या बदल्यात 258 धावा केल्या आहेत. यावेळी शुभमन, श्रेयस आणि जाडेजा यांच्या अर्धशतकांमुळे भारताने ही धावसंख्या उभारली आहे.
सामन्याची सुरुवात सलामीवीर शुभमनने उत्तम करुन दिली. अगरवाल (13) आणि पुजारा (26) यांनी त्याला काहीशी साथ दिली. तर पण शुभमनने अर्धशतक (52) झळकावल्यानंतर तोही तंबूत परतला. कर्णधार रहाणेही 35 धावा करुन बाद झाला, ज्यानंतर सलामीचा कसोटी सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने (Shreyas Ayer) अनुभवी रवींद्र जाडेजासह भारताचा डाव सावरत एक दिलासादायक धावसंख्या उभारली. अय्यर नाबाद 75 आणि जाडेजा नाबाद 50 धावांवर खेळत आहेत.
जेमिसनचा धोका कायम
गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून जेमिसनने 3 आणि साऊदीने एक विकेट घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात भारतीय फलंदाजांची डोकेदुखी ठरलेला काईल जेमिसनने 3 विकेट मिळवल्याने दुसऱ्या दिवशीही त्याला सांभाळूनच भारताला फलंदाजी करावी लागेल.
श्रेयसचा पदार्पणातच धमाका
श्रेय्यस अय्यरनं 2017 मध्ये भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं श्रीलंकाविरुद्ध धर्मशाला येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्याचदरम्यान, श्रेयस अय्यर कसोटीमध्ये पदापर्ण करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर त्याला मार्चमध्ये विराट कोहलीच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार होतं. परंतु अजिंक्य रहाणे अतिरिक्त गोलंदाज घेऊन मैदानात उतरला. श्रेयस अय्यरला पहिली कसोटी खेळण्यासाठी चार वर्षे प्रतीक्षा करावी लागली. पण अखेर पहिल्या सामन्यातच त्याने अर्धशतक झळकावलं असून सध्या तो 136 चेंडूत 75 धावांवर खेळत आहे.
संबधित बातम्या
- IND vs NZ: कोणत्याच भारतीय कर्णधाराला न जमलेला रेकॉर्ड रहाणेच्या नावावर, पहिल्या कसोटीतही किवींना नमवणार?
- BCCI नं खेळाडूंना हलाल मांस अनिवार्य केलं?, बोर्डानं दिलं स्पष्टीकरण
- Cheteshwar Pujara On Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबाबत चेतेश्वर पुजाराचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाला?