KKR Retention List IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी (IPL 2025) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रिंकू सिंग, सुनील नारायण आणि अजिंक्य रहाणेसह 12 खेळाडूंना रिटेन केले आहे. केकेआरच्या रिटेन्शन यादीमधील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे आंद्रे रसेललाही रिलीज (KKR Retention List IPL 2026) केले आहे. आंद्र रसेल 2014 पासून केकेआर संघासाठी खेळत आहे. केकेआरने एकूण 9 खेळाडूंना रिलीज केले आहे.

Continues below advertisement


केकेआरने संघात ठेवलेल्या खेळाडूंची यादी- (KKR Retention List IPL 2026)



  1. रिंकू सिंग

  2. अंग्रेश रघुवंशी

  3. अजिंक्य रहाणे

  4. मनीष पांडे

  5. रोवमन पॉवेल

  6. सुनील नारायण

  7. रमनदीप सिंग

  8. अनुकुल रॉय

  9. वरुण चक्रवर्ती

  10. हर्षित राणा

  11. वैभव अरोरा

  12. उमरन मलिक






केकेआरने संघातून काढलेल्या खेळाडूंची यादी- (KKR Released List IPL 2026)



  1. लवनीत सिसोदिया

  2. क्विंटन डी कॉक

  3. रहमानउल्ला गुरबाज

  4. वेंकटेश अय्यर

  5. आंद्रे रसेल

  6. मोईन अली

  7. स्पेंसर जॉन्सन

  8. अँरिक नोरखिया

  9. चेतन सकारिया


आयपीएल 2026 च्या लिलावात केकेआरकडे किती पैसे? (KKR IPL 2026)


कोलकाता नाईट रायडर्सने वेंकटेश अय्यरसह त्यांच्या अनेक महागड्या खेळाडूंना सोडले आहे. वेंकटेशला गेल्या लिलावात केकेआरने 23.75 कोटींना खरेदी केले. तर 12 कोटी रुपयांना संघात घेतलेल्या आंद्रे रसेललाही केकेआरने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडे आयपीएल 2026 च्या लिलावात 64.3 कोटी शिल्लक आहेत. 13 खेळाडूंच्या जागा शिल्लक असल्याने, केकेआर लिलावात जास्तीत जास्त 13 खेळाडू खरेदी करू शकते. केकेआर 6 परदेशी खेळाडू देखील खरेदी करू शकतो.


आयपीएल 2026 चा लिलाव कधी होणार? (IPL 2026 Auction)


इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीसाठी लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. हा एक मिनी लिलाव असेल, जो कदाचित एक दिवस चालेल. आयपीएलचा लिलाव 15 डिसेंबर रोजी होण्याची अपेक्षा आहे. आयपीएलचा लिलाव यूएईमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. 


संबंधित बातमी:


IPL Trade News 2026 : मोहम्मद शमीपासून अर्जुन तेंडुलकर, नितीश राणापर्यंत...; आयपीएलआधी चक्रावणारे टॉप 5 ट्रेड, कोण कोणात्या संघात दाखल?, A टू Z माहिती