IPL 2025 Timetable First Match : नव्या वर्षाच्या सुरुवातीनंतर क्रिकेटप्रेमींना आता आयपीएलच्या आगामी पर्वाची उत्सुकता लागली आहे. सगळेच क्रिकेटप्रेमी आपापल्या संघाच्या विजायासाठी आतापासूनच प्रार्थना करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या वर्षाचा आयपीएल नेमका कधीपासून चालू होणार? हे विचारले जात होते. असे असतानाच आता आयपीएल 2025 (IPL 2025) च्या पहिल्या समान्याची तारीख समोर आली आहे. खुद्द बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीच त्याबाबतची ठोस माहिती दिली आहे.
राजीव शुक्ला यांनीच दिली माहिती
आज बीसीसीआयच्या सचिवपदी माजी क्रिकेटर देवजीत सैकिया यांची निवड करण्यात आली. तसेच बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी प्रभजीत सिंग भाटीया यांची निवड करण्यात आली. त्यासाठी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आयपीएल 2025 विषयी महत्त्वाची माहिती दिली. येत्या 23 मार्च रोजीपासून आयपीएल चालू होईल, असे शुक्ला यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
2024 साली आयपीएल कधीपासून चालू झाला होता?
गेल्या वर्षीदेखील आयपीएलचा थरार चांगलाच रंगला होता. 2024 साली आयपीएलचे सामने 22 मार्च रोजी चालू झाले होते. या साली पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला होता. तर 26 मे रोजी या पर्वाचा अंतिम सामना खेळवला गेला होता. चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला होता. 2024 सालच्या आयपीएल ट्रॉफीवर कोलकाता नाईट रायडर्स या संघाने आपलं नाव कोरलं होतं.
दरम्यान, राजीव शुक्ला यांनी आयपीएलसोबतच WPL बद्दलही माहिती दिली आहे. WPL च्या सामन्यांबाबत सर्वाकाही ठरवण्यात आले आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल, असे शुक्ला यांनी सांगितले. त्यामुळे यंदाच्या WPL मध्ये काय विशेष असणार तसेच आयपीएल 2025 मध्ये पहिला सामना कोणामध्ये रंगणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येत्या 18 आणि 19 जानेवारी रोजी बीसीसीआयची पुढची बैठक होणार आहे. या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत चर्चा होणार आहे.
हेही वाचा :
Devajit Saikia : देवजित सैकिया यांची BCCI च्या सचिवपदी निवड!