मुंबई : क्रिकेट जगतातून मोठी घडामोड समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू देवजित सैकिया यांची बीसीसीआयच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी हा पदभार जय शाह यांच्याकडे होता. ते मूळचे आसामचे असून याआधी त्यांनी भारतीय संघाकडून क्रिकेट खेळलेले आहे.
विशेष बैठकीत झाली निवड
बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी आता देवजित सैकिया यांच्याकडे आली आहे. जय शाह यांची ते जागा घेतील. बीसीसीआयने नुकतेच विशेष बैठक बोलावली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सैकिया यांच्या सचिवपदाच्या निवडीसह प्रभतेज सिंह भाटीया यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
अगोदर अंतरिम सचिवपदाची जबाबदारी सांभाळली
जय शाह यांची 1 डिसेंबर रोजी आयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी बीसीसीआयचे सचिवपद सोडले होते. त्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी आपले अधिकार वापरून सैकिया यांच्याकडे बीसीसीआयच्या अंतरिम सचिवपदीपदाचा कारभार सोपवला होता. आता मात्र त्यांची अधिकृतपणे बीसीसीआयच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
सचिवपदी निवड होताच बैठकीत सहभागी
सचिवपदाचा पदभार स्वीकारता सैकिया हे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यासोबत टीम इंडियाच्या पुनरावलोकनाच्या बैठकीत भाग घेतला. यावेळी टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक, कर्णधार रोहित शर्मा, मुख्य सिलेक्टर अजित आगरकर आदी प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. साधारण दोन तास ही बैठक झाली.
कोण आहेत देवजित सैकिया
दैवजित सैकिया हे माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. ते मूळचे आसामचे आहेत. 1990 ते 1991 या काळात टीम इंडियासाठी एकूण चार प्रथम श्रेणीतील सामने खळले. ते भारतीय संघाचे यष्टिरक्षकही होते.
हेही वाचा :