Jasprit Bumrah : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबईच्या (mumbai indians) ताफ्यात परतला. पण जसप्रीत बुमराहच्या पोस्टनंतर मुंबई इंडियन्समध्ये (mumbai indians) सर्व काही ठिकाय का? अशी चर्चा रंगली आहे.  हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात आल्यानंतर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मुंबई इंडियन्सला (mumbai indians) सोशल मीडियावरुन अनफॉलो केल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सवर (mumbai indians)  नाराज आहे का? या चर्चाही सुरु झाल्या आहेत. जसप्रीत बुमराहच्या पोस्टनंतर आरसीबीच्या (RCB) चाहत्यांनी आरसीबीमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. सोशल मीडियावर सध्या जसप्रीत बुमराह आणि मुंबई इंडियन्स ट्रेंड करत आहे. 


हार्दिक पांड्याच्या घरवापसीनंतर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यानंतर अनेक चाहत्यांच्या मनात प्रश्नाचं काहूर माजलेय.  हार्दिक पांड्याला मुंबईने पुन्हा एकदा सामील केले, त्यानंतर बुमराहने इन्स्टाग्रामवर क्रिप्टिक मेसेज पोस्ट केलाय. त्याने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलेय की, "शांत राहणे कधी कधी सर्वात मोठं उत्तर असते..."  बुमराहच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. काहींच्या मते, बुमराहला रोहित शर्मानंतर कर्णधारपद हवे होते. पण हार्दिक पांड्या परतल्यानंतर ती संधी कमी झाली. त्यामुळेच बुमराह नाराज आहे. काही चाहत्यांनी तर बुमराहला आरसीबीच्या ताफ्यात येण्याची ऑफर दिली आहे.  






रोहितनंतर मुंबईचा कर्णधार कोण? Mumbai indians next captain


रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्सचं कर्णधार आहे. रोहित शर्मा सध्या 37 वर्षाचा आहे. त्यामुळे रोहित शर्मानंतर मुंबईचा कर्णधार कोण होणार ? याचाही प्रँचायजीकडून विचार सुरुच आहे. अशामध्ये हार्दिक पांड्या मुंबईच्या संघात परतल्यामुळे कर्णधारपदाचा तो सर्वात मोठा दावेदार ठरेल. हार्दिक पांड्या सध्या टीम इंडियाचा टी 20 चा कर्णधार आहे. त्याशिवाय हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातच्या संघाने विजेतेपद मिळवलेय. त्यामुळे रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्याकडे मुंबईच्या कर्णधारपदाची सुत्रे येऊ शकतात. पण याआधी रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराह याच्याकडे नेतृत्व येईल, असाच अंदाज वर्तवला जात होता. अशात चाहत्यांच्या मते हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात परतल्यामुळे जसप्रीत बुमराह नाराज झालाय. रिपोर्ट्नुसार, जसप्रीत बुमराहने इन्स्टाग्रामवरुन मुंबई इंडियन्सला अनफॉलोही केलेय.