Hardik Pandya : गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतण्याव औपचारिकरित्या शिक्कामोर्तब झालं आहे. मुंबई इंडियन्सकडून आणि आयपीएलकडून अधिकृतरित्या घोषणा करण्यात आल्याने गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या चर्चाांनाही पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या 24 तासांमध्येही बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्यामुळे हार्दिक सांगा कोणाचा? हे  विचारायची वेळ आयपीएल चाहत्यांवर आली होती. 






मुंबई संघाच्या मालकीण नीता अंबानी हार्दिकच्या घरवापसीवर म्हणाल्या की, “आम्ही हार्दिकचे घरी स्वागत करताना आनंदी आहोत! आमच्या मुंबई इंडियन्स कुटुंबासोबत हा एक हृदयस्पर्शी पुनर्मिलन आहे! मुंबई इंडियन्सच्या तरुण प्रतिभावंत होण्यापासून ते आता टीम इंडियाचा स्टार बनण्यापर्यंत, हार्दिकने खूप पुढे मजल मारली आहे आणि त्याच्यासाठी आणि मुंबई इंडियन्ससाठी भविष्यात काय आहे याबद्दल आम्ही उत्सुक आहोत!”






हार्दिकच्या पुनरागमनाबद्दल बोलताना आकाश अंबानी म्हणाले की, “मुंबई इंडियन्समध्ये हार्दिकला परतताना पाहून मला खूप आनंद झाला. ही एक आनंदी घरवापसी आहे. तो खेळत असलेल्या कोणत्याही संघाला तो उत्तम संतुलन देतो. हार्दिकचा एमआय कुटुंबासोबतचा पहिला कार्यकाळ खूप यशस्वी होता आणि आम्हाला आशा आहे की तो त्याच्या दुसऱ्या कार्यकाळात आणखी यश मिळवेल.”






हार्दिक पांड्याला रोख पैसे मोजून ट्रेड केलं आहे. त्यामुळे आगामी मोसमात पांड्या आता गुजरातसोबत दिसणार नाही. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात मोठ्या बदल्यांपैकी एक म्हणून हा ट्रेड पाहिला जात आहे. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याची डील 15 कोटींमध्ये झाली आहे. भारताच्या प्रमुख अष्टपैलू या खेळाडूने 2015 ते 2021 दरम्यान आयपीएलमध्ये एमआयच्या चार विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. 






इतर महत्वाच्या बातम्या