Mumbai Indians Playing 11 : इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL) मध्ये, मुंबई इंडियन्सचा संघ एका नवीन अवतारात दिसू शकतो. गेल्या मोसमात मुंबईचा (Mumbai Indians) संघ गुणतालिकेत सर्वात तळाला होता आणि त्याची कामगिरी खूपच खराब होती. पण यावेळी मुंबई पुन्हा आपल्या जुन्या फॉर्मात परतू शकते. मात्र, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) अनुपस्थिती संघाला नक्कीच जाणवणार आहे. बुमराह दुखापतीमुळे बाहेर आहे. जर आपण संघाच्या पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोललो तर नेमका संघ कसा असू शकतो, ते जाणून घेऊ...
आयपीएल 2022 मध्ये मुंबईची (MI) कामगिरी अत्यंत खराब झाली होती. संघाने एकूण 14 सामने खेळताना केवळ 4 जिंकले होते. त्यांना 10 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाचा या स्पर्धेतील याआधीचा रेकॉर्ड चांगला आहे. पण शेवटचा हंगाम अगदीच खराब होता. मात्र, यावेळी मुंबई संघात काही बदल करुन नक्कीच मैदानात उतरणार आहे. संघाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नाही. त्यामुळे त्यांचे नुकसानही होऊ शकते. या हंगामात मुंबईसाठी स्फोटक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर या यादीत सूर्यकुमार यादवचे नाव अग्रस्थानी असेल. त्याच्यासोबत कॅमेरून ग्रीन आणि टिळक वर्माही चांगली कामगिरी करू शकतात.
संपूर्ण हंगामात मुंबईचे सर्व खेळाडू उपलब्ध असतील. पण दक्षिण आफ्रिकेचे ट्रिस्टन स्टब्स आणि डेवाल्ड ब्रेविस काही सामने लवकर सोडू शकतात. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात वनडे मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे या दोघांना सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागू शकते. यावेळी मुंबईचा पहिला सामना बेंगळुरूकडून होणार आहे. हा सामना 2 एप्रिल रोजी होणार आहे. मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे तर यामध्ये ईशान किशन, कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांची जागा जवळपास निश्चित झाली आहे. रमणदीप सिंग, तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड हे देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात. तर गोलंदाजीची धुरा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरवर असू शकते.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, हृतिक शोकीन, कुमार कार्तिकेय, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ.
हे देखील वाचा-