Royal Challengers Bangalore Playing 11 IPL 2022 : फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये चांगली कामगिरी केली. संघाने पात्रता फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. पण राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्यामुळे ते अंतिम फेरीत पोहचू शकले नाहीत. यंदा पुन्हा एकदा संघ दमदार कामगिरीसह पात्रता फेरीपर्यंतचा प्रवास करू शकतो आणि जे गेल्या इतक्या वर्षात झालं नाही ते करुन आयपीएलचा खिताब मिळवू शकतो का? याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. आरसीबीचा पहिला सामना मुंबई इंडियन्ससोबत आहे. या सामन्यासाठी आरसीबीची प्लेइंग इलेव्हन कशी असेल हा ही एक प्रश्न आहे.
आरसीबीने यावेळी संघात बदल केले आहेत. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील युवा वेगवान गोलंदाज अविनाश सिंग आणि परदेशी खेळाडू रीस टोपले यांचा संघात समावेश केला आहे. हे दोघेही चांगले खेळाडू आहेत आणि संधी मिळाल्यावर ते चमकदार कामगिरी करू शकतात. त्याचबरोबर अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड अजूनही दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे त्याच्या खेळाबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या व्यतिरिक्त, कदाचित संघातील सर्व खेळाडू उपलब्ध असतील.
आरसीबीकडे ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहलीसारखे स्फोटक फलंदाज आहेत. हे दोन्ही खेळाडू सामन्याची स्थिती क्षणार्धात बदलण्यात माहीर आहेत. हे दोन्ही अनुभवी खेळाडू आरसीबीसाठी चमकदार कामगिरी करू शकतात. यासोबतच कॅप्टन डुप्लेसिसही चमत्कार दाखवू शकतो. मायकल ब्रेसवेल आणि रजत पाटीदार यांना संधी मिळाली तर तेही निराश करणार नाहीत. पाटीदारने गेल्या मोसमात चांगली फलंदाजी केली. संघाकडे मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. या दोघांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. तसंच दिनेश कार्तिक हा संघाचा फिनिशरही प्रभावशाली कामगिरी करु शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संभाव्य प्लेइंग इलेव्हन : फाफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर/मायकेल ब्रेसवेल, हर्षल पटेल, वनिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज
IPL 2023 चे काही नवीन नियम
निर्धारित वेळेबाहेरील प्रत्येक षटकासाठी 30-यार्ड वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे.
यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या चूकीच्या हालचालींमुळे डेड बॉल आणि 5 पेनल्टी रन्स मिळतील.
नाणेफेक झाल्यानंतर संघांनी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करायची आहे.
फ्रँचायझी 15-खेळाडूंच्या टीम शीटचे नाव देतील, ज्यामध्ये 4 पर्यायांपैकी एक इम्पॅक्ट खेळाडू असेल.
हे देखील वाचा-