Dwayne Bravo IPL Retirement: महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील फ्रँचायझी चेन्नई सुपरकिंग्जनं (Chennai Super Kings) आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी (IPL Mini Auction) ड्वेन ब्राव्होला (Dwayne Bravo) रिलीज केलं होतं. त्यानंतर ब्राव्होनं मिनी ऑक्शनसाठी आपलं नाव दिलं नाही. आता त्यानं आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईचा संघानं ब्राव्होच्या खांद्यावर गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे.


चेन्नई सुपरकिंग्जनं आपल्या निवेदनात असं म्हटलंय की, "आयपीएलच्या पुढच्या हंगामात ड्वेन ब्राव्होची सीएसकेच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलीय. लक्ष्मीपती बालाजी वयैक्तिक कारणांमुळं आयपीएलच्या पुढच्या हंगामातून ब्रेक घेत आहे. पण तो सीएसके अकादमीसाठी उपलब्ध असेल."


 


ट्वीट-






 


ट्वीट-






 


सीएसकेच्या निवेदनात काय म्हटलंय?
चेन्नई सुपरकिंग्जनं आपल्या निवेदनात असं म्हटलंय की, आयपीएलच्या पुढच्या हंगामात ड्वेन ब्राव्होची सीएसकेच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलीय. लक्ष्मीपती बालाजी वयैक्तिक कारणांमुळं आयपीएलच्या पुढच्या हंगामातून ब्रेक घेत आहेत. पण तो सीएसके अकादमीसाठी उपलब्ध असेल. ब्राव्हो 2011 मध्ये सीएसकेच्या संघाच्या संघाशी जुडला होता. चेन्नईच्या संघात त्यानं ऑलराऊंडरची भूमिका बजावत होता. चेन्नईनं आतापर्यंत जिंकलेल्या चार पैकी तीन ट्रॉफीत ब्राव्हो संघाचा भाग होता. 


ड्वेन ब्राव्होची प्रतिक्रिया
आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतर आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर ड्वेन ब्राव्हो म्हणाला, "मी या नवीन प्रवासाची वाट पाहत आहे, जे मला निवृत्तीनंतर करायचं आहे. मला गोलंदाजांसोबत काम करायला मजा येते आणि मी या भूमिकेसाठी उत्सुक आहे. प्रशिक्षक बनल्यानंतर मला फारसं अॅडजस्ट करण्याची गरज वाटत नाही. जेव्हा मी खेळत असतो तेव्हा मी नेहमी गोलंदाजांसोबत काम करतो आणि फलंदाजांपेक्षा एक पाऊल पुढं राहण्याचा माझा प्रयत्न असतो. फरक एवढाच की मी यापुढं मिड-ऑन किंवा मिड-ऑफमध्ये उभा राहणार नाही. आयपीएलच्या इतिहासात मी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आयपीएलचा भाग बनून मी आनंदी आहे”


हे देखील वाचा-