Vijay Hazare Trophy 2022 Final: कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राच्या संघानं सौराष्ट्रासमोर (Maharashtra vs Saurashtra) 249 धावांचं लक्ष्य ठेवलंय. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेला महाराष्ट्राचा संघ संघर्ष करताना दिसला. मात्र, ऋतुराज गायकवाडनं एकाकी झुंज देत 131 चेंडूत 108 धावांची खेळी केली. ऋतुराज व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही. दरम्यान, सौराष्ट्राच्या संघानं गोलंदाजी हीच त्यांची खरी ताकद असल्याचं दाखवून दिलं. त्यांनी या सामन्यात अत्यंत किफायती गोलंदाजी केली.
या सामन्यात सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनादकट नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या महाराष्ट्राच्या संघाची सुरुवात खराब झाली. महाराष्ट्राच्या डावातील पाचव्या षटकात सलामीवीर पवन शाह रन आऊट झाला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि सत्यजीत बच्छावनं संयमी खेळी दाखवत संघाचा डाव पुढं नेला. परंतु, 25व्या षटकात सत्यजीत बाद झाला. मात्र, ऋतुराज गायकवाडनं एकाकी झुंज सुरूच ठेवली. त्यानं 131 चेंडूत 108 धावांचं योगदान दिलं. दरम्यान, 42 व्या षटकातील अखेरच्या ऋतुराज गायकवाड बाद झाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. सौराष्ट्राकडून चिराग जानीनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, जयदेव उनादकट, प्रेरक मांकड आणि प्रार्थ भूत यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स जमा झाली.
संघ
महाराष्ट्राची प्लेईंग इलेव्हन:
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), सत्यजीत बच्छाव, अंकित बावणे, अजीम काझी, राजवर्धन हंगरगेकर, शमशुजामा काझी, सौरभ नवले (विकेटकिपर), मनोज इंगळे, मुकेश चौधरी, पवन शहा, नौशाद शेख.
सौराष्ट्राची प्लेईंग इलेव्हन:
हार्विक देसाई (विकेटकिपर), शेल्डन जॅक्सन, जय गोहिल, समर्थ व्यास, प्रेरक मंकड, अर्पित वसावडा, चिराग जानी, धर्मेंद्रसिंह जडेजा, जयदेव उनाडकट (कर्णधार), कुशांग पटेल, पार्थ भुत.
सौराष्ट्र आणि महाराष्ट्रात काटे की टक्कर
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर यांच्यात विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जातोय. महाराष्ट्राचा संघानं पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. तर, सौराष्ट्राचा संघ दुसऱ्यांना ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज झालाय. दोन्ही संघानं संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून दाखवलीय. यामुळं आजचा सामना कोण जिंकतंय? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
हे देखील वाचा-