Andres Balanta Dies: कतारमध्ये फुटबॉल विश्वचषकाचा थरार सुरु असताना कोलंबियाचा मिडफील्डर आंद्रेस बालांटा (Andres Balanta) यांचं निधन झाल्याची माहिती समोर आलीय. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी अर्जेंटिना फर्स्ट डिव्हिजन क्लब ऍटलेटिको टुकुमनच्या (Atletico Tucuman) ट्रेनिंगदरम्यान तो जमीनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तातडीनं तुकुमन हेल्थ सेंटरमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी ताबडतोब त्याचावर उपचार करत आंद्रेस जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टर अपयशी ठरले. 


ऍटलेटिको टुकुमन क्लबसाठी प्रशिक्षण घेत असताना मंगळवारी (29 नोव्हेंबर) आंद्रेस बालांटाला अपघात झाला. आंद्रेस ट्रेनिंगदरम्यान खाली कोसळला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथं त्यानं अखेरचा श्वास घेतला.


 


ट्वीट-






 


ट्वीट-






 


आंद्रेस बालांटाच्या मृत्यूनं क्रिडाविश्वात खळबळ
आंद्रेस बालांटा जुलै 2021 मध्ये डेपोर्टिव्हो कॅली येथून ऍटलेटिकोमध्ये सामील झाला. दरम्यान, त्यानं 2019 च्या अंडर -20 विश्वचषकात कोलंबिया राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आंद्रेसच्या मृत्यूच्या बातमीनं क्रिडाविश्वात खळबळ माजली आहे. आंद्रेसचा मृतदेह लवकरात लवकर त्याच्या मायदेशात घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्व काही तयारी केली आहे, अशी माहिती क्लब व्यवस्थापनानं पत्रकार परिषदेत सांगितलं. कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषकादरम्यान आलेल्या या दुखःद बातमीमुळं संपूर्ण फुटबॉल जगत शोक व्यक्त करत आहेत. कारण 22 वर्षाच्या वयात एखाद्या तरुण खेळाडूचा मृत्यू होणं ही खूपच दुर्दैवी घटना आहे.


हे देखील वाचा-